shivshahi-bus-auto-crash-beed  
महाराष्ट्र

शिवशाहीची ऑटोला जोरदार धडक, एकाचा मृत्यू, संतप्त जमावाकडून बसवर दगडफेक

shivshahi accident : शिवशाही बसच्या अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू, संतप्त जमावाने बसवर दगडफेक केली. परळी तालुक्यातील पांगरी गावाजवळ अपघात झाला.

Namdeo Kumbhar

  • पांगरी गावाजवळ शिवशाही बस आणि रिक्षाची भीषण धडक

  • रिक्षाचालक श्रीनिवास राठोड यांचा जागीच मृत्यू

  • संतप्त जमावाने बसवर दगडफेक करत आंदोलन केलं

  • पोलिसांनी जमाव पांगवून वाहतूक सुरळीत केली

shivshahi bus accident in Beed Parli road : बीडहून नांदेडकडे जाणाऱ्या शिवशाही बस आणि रिक्षा यांच्यात परळी तालुक्यातील पांगरी गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालक श्रीनिवास राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे संतप्त जमावाने शिवशाही बसवर दगडफेक केली. अपघातानंतर परिसरात तणाव निर्माण झाला आणि सुमारे दीड तास वाहतूक ठप्प झाली. स्थानिकांनी तात्काळ या प्रकरणी पोलिसांना पाचारण केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक श्रीनिवास राठोड हे शेतात मजूर महिलांना सोडून परळीकडे परतत होते. पांगरी कॅम्पजवळ शिवशाही बसने रिक्षाला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, रिक्षा पूर्णपणे चक्काचूर झाली आणि चालकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच स्थानिकांनी संतप्त होऊन बसवर दगडफेक केली. त्यामुळे महामार्गावरील परिस्थिती चिघळली.

घटनास्थळी परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत करून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी नागरिकांना शांत करत वाहतूक सुरळीत केली. पोलिसाकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: 26 त्र्यंबकेश्वरातील प्रवेश कर कायमस्वरूपी रद्द; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिकमध्ये घोषणा

Kamaltai Gawai : एकजीव आणि सक्षम राष्ट्र निर्माण करायला हवं; कमलताई गवईंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काय सल्ला दिला?

Nagpur Brain Fever: मेंदूज्वर सदृश्य आजाराचा वाढला धोका, मेंदूज्वराने 10 बालकांचा बळी

IND Vs PAK सामना 'या' हल्ल्यामुळे थांबला, स्टेडियम धुराने भरले; पाहा नेमकं काय घडलं? VIDEO

Crime News: बहीण आणि पत्नीचं भांडण सोडवायला गेला; संतापलेल्या बायकोने नवऱ्याचा प्रायव्हेट पार्ट कापला

SCROLL FOR NEXT