Shahajibapu Patil On Dhairyashil Mohite Patil Saam Tv
महाराष्ट्र

Shahajibapu Patil: ज्यांनी वाटुळे केले त्यांच्याकडे जाऊ नका, शहाजीबापू पाटील यांचा धैर्यशील मोहिते पाटील यांना सल्ला

Shahajibapu Patil On Sharad Pawar: माढ्याचे भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांच्या समर्थनार्थ पंढरपुरात शिवसेनेचा मेळावा पार पडला. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार शहाजी पाटील यांनी शरद पवारांवर निशाना साधला आणि मोहिते पाटील यांना सल्ला दिला.

भारत नागणे

Shahajibapu Patil On Dhairyashil Mohite Patil:

'ज्या मोहिते पाटलांचे बारामतीकरांनी पार वाटुळे केले. त्या बारामतीकरांकडे त्यांनी पुन्हा जावू नये.', असा सल्ला सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite Patil) यांना सल्ला दिला आहे. पंढरपूरमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे. माढ्याचे भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांच्या समर्थनार्थ पंढरपुरात शिवसेनेचा मेळावा पार पडला. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार शहाजी पाटील यांनी शरद पवारांवर निशाना साधला आणि मोहिते पाटील यांना सल्ला दिला.

'रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आता भारतीय जनता पार्टी स्विकारली आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षाने विधान परिषदेत आमदार केले आहे. त्यांच्या अनेक संस्थांना कोट्यावधी रूपयांचे कर्ज दिले आहे. अशा परिस्थितीत अचानक निर्णय विजयसिंह मोहिते पाटील हे कुणाला घेऊ देतील असं वाटत नाही. मोहिते पाटील कुटुंबाशी माझा जिव्हाळा आहे. विठ्ठलाच्या साक्षीने सांगतो मोहिते पाटील घराण्याने वेडंवाकडं जाण्याचं धाडस करू नये.'

तसंच, 'जिथं आपलं मोहित्याचं भरपूर वाटुळ केलंय त्याच बारामतीकडे कृपा करून जावू नये असं मला कळतं.', असा सल्ला ही त्यांनी मोहिते पाटील कुटुंबाला दिला आहे. मोहिते पाटील सध्या शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शहाजी पाटील यांनी मोहिते पाटील यांना सल्ला दिला. त्यांनी मोहिते पाटील यांना दिलेल्या राजकीय सल्ल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.‌

दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघात भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी गावा गावात जाऊन जनतेची गाठभेट घेत आहेत. गाव भेटी दौऱ्यादरम्यान मोहिते पाटील हे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे मतं जाणून घेत आहेत. धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज असून ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT