Uddhav Thackeray saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Political News: 'मांडीला मांडी लावून बसले की पवित्र आणि विरोधात गेले तर गद्दार', शिवसेनेच्या बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Uddhav Thackeray Thane Meeting: अशामध्ये उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर आता शिवसेनेचे नेते आणि आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Priya More

नवनीत तापडिया, छत्रपती संभाजीनगर

Sanjay Shirsat On Uddhav Thackeray: ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ठाण्यातील कार्यक्रमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाच्या नेत्यांवर जोरदार टीका केली होती. शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी करत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरे शिंदे गटाच्या नेत्यांवर वारंवार गद्दार असल्याची टीका करत आहेत.

अशामध्ये उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर आता शिवसेनेचे नेते आणि आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. 'मांडीला मांडी लावून बसले की पवित्र आणि विरोधात गेले तर गद्दार. खऱ्या अर्थाने गद्दारी उद्धव ठाकरे यांनी केली,', असा आरोप संजय शिरसाट यांनी लावला आहे.

संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'ती उत्तर भारतीयांची सभा नाही. तर ती एक बैठक होती. कोण ती प्रियंका चतुर्वेदी ती भाषण करत होती. हिच्याबद्दल खैरें म्हणाले होते की, आदित्य ठाकरेंनी तिचे सौंदर्य पाहून खासदार केले. दरवेळी पक्षातून लोकं गेली की गद्दार गेले म्हणायची त्यांची सवयी आहे. खऱ्या अर्थाने गद्दारी उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसैनिकांना दाबायच काम त्यांनी केले.'

आनंद दिघे यांच्या अंत्ययात्रेवरुन देखील संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. 'जे दिघे साहेबांचे नाव घेतात. त्यांच्या अंत्ययात्रेला उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातील एकही जण का उपस्थित नव्हता? त्यांना माहीत होतं अंत्ययात्रेला गेलं तर लोकं दगड मारतील म्हणून ते गेले नाही. दिघेंचा मृत्यू घातपात झाला आहे.हे सर्वांना माहीत आहे. ठाणेकरांना माहिती आहे.' तसंच, 'सत्तेची मजबूरी होती म्हणून तुम्ही काँग्रेसकडे गेले हे तुम्ही काल सांगितले. तुम्ही १० शिवसैनिकांचे नाव सांगावे त्यांनी त्यांना उभं केलं.', असे थेट आव्हान त्यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे.

यावेळी संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, 'त्यांनी राजीनामा द्यावा. 2019 मध्ये शिवसेना-भाजप म्हणून निवडणूक लढली. स्वाभिमानी असाल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि जनतेच्या दरबारात जावं. तुमच्या मांडीला मांडी लावून बसले तर तो पवित्र आणि तुमच्याविरोधात गेले की ते गद्दार. उद्धव ठाकरे हे सध्या वैफल्यग्रस्त होऊन अशी विधाने करत आहेत.', अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

संजय शिरसाट यांनी पुढे असे देखील सांगितले की, 'अनेक मोठे नेते आमच्याकडे येण्यासाठी उत्सुक आहेत. आता उद्धव ठाकरे यांनीच सांगितले जा म्हणून अनेक नेत्यांना, महिला आघाडींना आता त्यांनी डस्टबिनमध्ये टाकले. त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक नेते आमच्याकडे येताना दिसतील. नवीन आलेल्यांना पंचपक्वान द्यायचे आणि जुन्या शिवसैनिकांना बाजूला करायचं. संजय राऊत म्हणतात गद्दारांना उद्ध्वस्त करायचं. तर आता उद्धव ठाकरेंच त्यांना उद्ध्वस्त करतील.', असं म्हणत त्यांनी संजय राऊतांवर देखील निशाणा साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

SCROLL FOR NEXT