Pune Terrorist News Update: पुणे दहशतवादी प्रकरणात मोठी अपडेट, आरोपींच्या घरातील पंख्यात सापडलेल्या चिठ्ठीतून धक्कादायक माहिती उघड

दहशतवाद्यांच्या घरात लापवलेला एक कागद सापडलाय. या कागदात धक्कादायक माहिती मिळीये.
Pune Terrorist News Update
Pune Terrorist News UpdateSaam TV

Pune Crime News: पुण्यातील कोथरुड येथून काही दिवसांपूर्वी दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं. सध्या एटीएसकडून (ATS) त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या तपासात मोठी माहिती समोर आलीये. दहशतवाद्यांच्या घरात लापवलेला एक कागद सापडलाय. या कागदात एटीएसला धक्कादायक माहिती मिळीये. (Latest Marathi News)

पुण्यात पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी घरात लावलेल्या फॅनमध्ये एक कागद लपवला होता. कागदामध्ये बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया लिहिण्यात आली होती. ही सर्व प्रक्रिया या दोघांनी हाताने लिहिलेली होती. युनस साकी आणि इम्रान खान या दोघांच्या घरात सीलींग फॅनमध्ये हा कागद सापडलाय.

Pune Terrorist News Update
Pune Terrorists Arrest Case: पुण्यात अटक केलेल्या दहतवाद्यांकडून धक्कादायक माहिती उघड, जंगलात केली होती बॉम्बस्फोटाची चाचणी

बंदुकीच्या गोळ्याही सापडल्या

ॲल्युमिनीअम पाईप बल्बच्या फिलॅमेंटस आणि दोन बंदुकीच्या गोळ्या देखील या ठिकाणी सापडल्यात. या दोघांनी सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या जंगलांमध्ये जाऊन बॉम्बस्फोट घडवण्याची चाचणी केली होती. अशी माहिती एटीएसने दिली आहे.

१८ जुलै रोजी पुण्यातील कोथरूड भागात दुचाकी चोरत असताना हे दोन वॉन्टेड दहशतवादी सापडले होते. यानंतर पोलिसांनी त्यांची झडती घेतली. तेव्हा पोलिसांनी त्याच्या घरातून काही वस्तू जप्त केल्या होत्या. तसेच दोघांना ताब्यत घेतलं आहे.

Pune Terrorist News Update
Malegaon Bomb blast update मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणी नवा ट्विस्ट, पाहा व्हिडिओ

२५ जुलै रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात या दोघांना हजर करण्यात आले होते. त्यावेळी या दोघांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती एटीएसने न्यायालयात दिली होती. त्यानंतर तपासात आता बॉम्ब बनवण्याचा कागद देखील सापडलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com