Political News: मोदींना हुकूमशाह म्हणणारे उद्धव ठाकरे सोनिया गांधींपुढे लोटांगण घालतात; चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray,
Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray, saam tv
Published On

Chandrashekhar Bawankule News: ठाकरे गटाकडून ठाण्यात हिंदी भाषक कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्यातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. २०२४ ची आपली संधी हुकली तर हा संपूर्ण देश नालायक आणि हुकूमशहांच्या हातात जाईल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.  (Latest Marathi News)

त्यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मोदींना हुकूमशाह म्हणणारे उद्धव ठाकरे सोनिया गांधींपुढे लोटांगण घालतात अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray,
Girish Mahajan On Uddhav Thackeray: लोकसभेला उभे राहा आणि दोन खासदार निवडून दाखवा; उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर गिरीश महाजनांचं खुलं आव्हान

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, की बऱ्याच दिवसानंतर उबाठाचे नेते उद्धव ठाकरे काल घराबाहेर पडले आणि मजल दर मजल करत त्यांनी ठाणे गाठले. आणि कधी नव्हे ते त्यांना उत्तर भारतीय मतदारांची आठवण झाली. आणि पुन्हा एकदा पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्यावर टीका केली.

देशासाठी मोदीजी काय करतात याचे प्रमाणपत्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देण्याची गरज नाही. मोदीजींमुळे देशाची मान उंचावली आहे. पण उद्धवजी तुमच्या हिंदुत्वविरोधी भूमिकेमुळे प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिकाची मान शरमेनं खाली झुकली आहे. मोदीजींना हुकूमशाह म्हणणारे तुम्ही सोनिया गांधींपुढे मात्र लोटांगण घालत आहात अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray,
Satara Accident News: २० ते २५ प्रवाशांनी भरलेल्या बसचा ब्रेक फेल; भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू

माझे कुटुंब माझी जबाबदारी हे फक्त तुमच्या भाषणात आहे. प्रत्यक्ष कृतीमध्ये मात्र आदित्य ठाकरेंना मंत्री करताना तुम्हाला सच्चा शिवसैनिक दिसला नाही. त्या प्रामाणिक शिवसैनिकाला दूर ठेवले म्हणूनच कधीकाळी हजारोंच्या उपस्थितीत सभा घेणाऱ्या उद्धव ठाकरेंना नाट्यगृहात एकपात्री प्रयोग करावा लागला. तुमचे असेच नाट्य सुरू राहिले तर २०२४ नंतर तुमच्यावर चारचौघात भाषण करण्याची वेळ येईल, असे देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com