Girish Mahajan On Uddhav Thackeray: लोकसभेला उभे राहा आणि दोन खासदार निवडून दाखवा; उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर गिरीश महाजनांचं खुलं आव्हान

तसेच शिवसेनेसोबतची साथ सोडून फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथ विधीवरुन देखील उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला आहे.
Girish Mahajan Uddhav Thackeray
Girish Mahajan Uddhav ThackeraySaam tv

Maharashtra Political News: शनिवारी ठाण्यात हिंदी भाषिक मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित करताना भाजपवर हल्लाबोल केला. तसेच शिवसेनेसोबतची साथ सोडून फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथ विधीवरुन देखील उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला. उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देत मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणुकीला सामोरे जाण्याचे आव्हान केले आहे. (Latest Maharashtra Political News)

तुम्ही खुल्या काँग्रेसमध्ये गेल्याचं सांगता जर तुमच्यात हिंमत होती तर निवडणुकांआधी काँग्रेससोबत जायचं होतं. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर निवडून आलात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी भाषण केले तेव्हा तुम्ही निवडून आलात. तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही लोकसभेला उभे राहा आणि दोन खासदार निवडून आणून दाखवा, असं आव्हान गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना केलं आहे.

Girish Mahajan Uddhav Thackeray
Madhya Pradesh Crime News: निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती; १० वर्षांच्या चिमुकलीवर क्रूरतेने सामूहिक अत्याचार, घटनेनं मध्य प्रदेश हादरलं

तुम्ही मोदींना हुकूमशहा म्हणता हुकूमशाही कशाला म्हणतात ते माहित आहे का? तुमच्या हुकूमशाहीमुळे 55 पैकी आठ-दहा आमदार सुद्धा राहिले नाहीत. आमदार आणि मंत्राने तुम्ही भेटला नाही म्हणून लोक तुमच्या सोबत राहिले नाहीत, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

म्हणूनच फक्त शिल्लक सेना उरली आहे

कोरोना बद्दल तुम्ही काय सांगता मृतदेहांच्या लपेटणाऱ्या बॅगमध्ये आणि रेमडेसिवर इंजेक्शनमध्ये तुम्ही कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार तुम्ही केला. माझा परिवार म्हणत एक दिवस तरी बाहेर पडलात का. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रत्येक जिल्ह्यात गेले, दोन वेळा त्यांना कोरोना झाला. तरी एकही दिवस ते घरी बसले नाहीत, आम्हीही रस्त्यावर होतो. तुम्ही त्यावेळी कुठे होता आज तुम्ही कुठल्या अधिकाराने विचारता? लोकांना सगळं माहित आहे. आता तुमच्यासोबत म्हणूनच फक्त शिल्लक सेना उरली आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

Girish Mahajan Uddhav Thackeray
Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेली 'ती' घोषणा हवेतच विरली; ठाकरे गटाची CM शिंदेंवर टीका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com