Shivrajyabhishek Din 2025 Saam Tv
महाराष्ट्र

Shivrajyabhishek Din 2025: छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा! शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek Sohala 2025: आज छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दिवशी तुमच्या प्रियजनांना खास शुभेच्छा पाठवा.

Siddhi Hande

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप मोठी कामगिरी केली आहे. ६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. हा दिवस सर्वांसाठीच खूप अभिमानाचा दिवस होता. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी पूजा केली.८ वेगवेगळ्या नद्यांमधून आणलेल्या जलाने शिवाजी महाराजांवर अभिषेक करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक सोहळा आजही साजरा केला जातो. आज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhisjek Sohla) साजरा केला जात आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियजनांना मेसेज पाठवून शुभेच्छा देऊ शकतात.

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शुभेच्छा (Rajyabhishek Din Wishes Whatsapp Messages)

  • स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी वंदन!

  • या राज्याभिषेक दिनी आपल्यातही तेज, पराक्रम आणि स्वाभिमान जागृत होवो

  • शिवस्वराज्याची ही प्रेरणा आपल्या जीवनात नवे बळ देवो

  • शौर्य, धैर्य आणि स्वराज्याची प्रेरणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! राज्याभिषेक दिनाच्या मंगल शुभेच्छा!

  • शिवज्योतीचा प्रकाश अखंड तेवत राहो! राज्याभिषेक दिनाच्या शिवमय शुभेच्छा!

  • स्वराज्याचा अभिमान जागवणारा दिवस – छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या जयघोषपूर्ण शुभेच्छा!

  • शिवरायांच्या राज्याभिषेक दिनी त्यांच्या तत्वांचा आपल्या आयुष्यात ठसा उमटू दे!

  • शिवरायांचे स्वप्न, शिवशासनाचा प्रकाश… राज्याभिषेक दिन साजरा करूया अभिमानाने! शुभेच्छा!

  • राज्याभिषेक म्हणजे आत्मनिर्भरतेचं प्रतीक! छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या प्रेरणादायी शुभेच्छा!

  • जय शिवराय! स्वराज्य स्थापनेचा हा दिव्य दिवस प्रत्येक मराठी मनात नवा जोश निर्माण करो! शुभेच्छा!

  • राज्याभिषेक दिनी शिवरायांचे विचार अंगीकारू, समाज आणि राष्ट्रासाठी योगदान देऊ! शुभेच्छा!

  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमास वंदन करत, राज्याभिषेक दिनाचा सन्मान करूया!

  • राज्याभिषेकाचा दिवस म्हणजे नवचैतन्याचा उत्सव! शिवप्रेमी प्रत्येक हृदयात आज शिवशक्ती नांदो!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT