ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि सुवर्ण अक्षरांनी कोरलेला प्रसंग मानला जातो.
या सोहळ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना सार्वभौम राजा म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आणि मराठा साम्राज्याची खऱ्या अर्थाने स्थापना झाली असं म्हटलं जातं.
६ जून १६७४ रोजी म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ रोजी राज्याभिषेक करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर करण्यात आला होता.
राज्याभिषेकाच्या दिवसापासून शिवाजी महाराजांनी 'राज्याभिषेक शक' (शिवशक) ही नवीन कालगणना सुरू केली.
राज्याभिषेकासाठी 29 मे पासून विधी सुरू झाले होते. म्हणजेच तब्बल 9 दिवस अगोदर या दिमाखदार सोहळ्याला सुरुवात झाली होती.
या ऐतिहासिक सोहळ्याला शिवराज्यभिषेक किंवा राज्याभिषेक सोहळा असं म्हटलं जातं.