shivraj singh chouhan sabha in satara lok sabha constituency tomorrow dhananjay mahadik saam tv
महाराष्ट्र

Satara BJP : भांड्याला भांड लागत असलं तरी शेवट गाेड हाेईल, गाेरे-उदयनराजेंच्या उपस्थितीत धनंजय महाडिकांना विश्वास

ओंकार कदम

Satara News :

सातारा, माढा लोकसभा मतदारसंघात (madha lok sabha constituency) भांड्याला भांड जरी लागत असलं तरी चित्रपटाचा शेवट जसा गोड होतो त्याप्रमाणे सर्व काही व्यवस्थित होईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक (mp dhananjay mahadik) यांनी गुरुवारी सातारा येथे व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील गांधी मैदान येथे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांची उद्या (ता. 24 फेब्रुवारी) सभा आयाेजिल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी माध्यमांना दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

येथील शासकीय विश्रामगृहात आयाेजिलेल्या पत्रकार परिषदेत खासदर धनंजय महाडिक बाेलत हाेते. त्यावेळी खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale latest marathi news), आमदार जयकुमार गोरे आणि जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी उपस्थित हाेते. (Maharashtra News)

खासदार धनंजय महाडिक म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या 24 फेब्रुवारीला मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, हातकणंगले आणि सातारा दौऱ्यावर येत आहेत. त्यांची कोल्हापूर हातकणंगलेसह साताऱ्यातील गांधी मैदान येथे जाहीर सभा होणार आहे.

शेवट गाेड हाेईल : खासदार धनंजय महाडिक

देशातील 543 लोकसभा मतदारसंघावर भाजपाचा दावा असला तरी साताऱ्यात महायुतीतून जो उमेदवार दिला जाईल त्याला विजयी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. सध्या सातारा, माढा लोकसभा मतदारसंघात भांड्याला भांड जरी लागत असेल तरी एखाद्या चित्रपटाचा शेवटचा गोड होतो तसेच सर्व काही ठीक होईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी माध्यमांच्या प्रश्नावर व्यक्त केला.

महायुतीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कलगीतुरा

गेल्या काही दिवसांपासून माढा लाेकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते (अजित पवार गट) रामराजे नाईक-निंबाळकर हे भाजप खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर टीका करत आहेत. दूसरीकडे सातारा लाेकसभा मतदारसंघातून कराडचे नेते अतूल भाेसले यांनी निवडणुक लढवावी असे मत आमदार जयकुमार गाेरे यांनी व्यक्त केले. परिणामी खासदार उदयनराजे भाेसले यांच्या समर्थकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. नेत्यांच्या भावनांमुळे सातारा आणि माढा येथील महायुतीचे नेत्यांत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कलगीतुरा दिसून येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

SCROLL FOR NEXT