Satara Politics: साताऱ्याचं राजकारण पुन्हा तापलं! रामराजेंचा खासदार रणजितसिंह निंबाळकरांना खोचक टोला, म्हणाले; छोटा राजन...

Maharashtra Politics: सातारच्या राजकारणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर आणि माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील वाद काही नवा नाही.
ranjitsinh naik nimbalkar & ramraje naik nimbalkar
ranjitsinh naik nimbalkar & ramraje naik nimbalkarsaam tv
Published On

Satara Politics:

सातारच्या राजकारणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर आणि माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील वाद काही नवा नाही. एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव घेतले जाते. सध्या माढा लोकसभेवरुन महायुतीत रस्सीखेच सुरू असतानाच पुन्हा एकदा रामराजे निंबाळकरांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

माढा लोकसभा (Madha Loksabha) मतदारसंघावरून महायुतीतल वातावरण चांगलच तापलं आहे. भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (RanjitSingh Naik Nimbalkar) आणि राष्ट्रवादी नेते रामराजे नाईक निंबाळकर ह्या दोघांनी आत्ता पर्यंत एकमेकांवर टीका करण्याची एक संधी सोडलेली नाही. आता पुन्हा एकदा एका सभेत रामराजे नाईक निंबाळकर यांनी खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

काय म्हणाले रामराजे नाईक निंबाळकर?

एका जाहीर कार्यक्रमात बोलताना रामराजे नाईक निंबाळकर (RamrajeNaik Nimbalkar) यांनी केवढी दहशत? त्या छोटा राजनची दहशत नव्हती त्याच्यापेक्षा या सहा फुटाच्या छोटा राजनची दहशत आहे. विकास बाजूला राहिला, दुसऱ्याने केलेल्या विकासावर स्वतःचे नाव लावायचे. हा माणूस एक मिनीट जरी खरं बोलला तरी खूप झालं, अशी खोचक टीका रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ranjitsinh naik nimbalkar & ramraje naik nimbalkar
Cotton Price Issue : शेतक-यांचे नव्हे व्यापाऱ्यांचे सरकार : आमदार के.सी.पाडवी

दरम्यान, रामराजे नाईक निंबाळकर यांच्या टीकेला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही जोरदार पलटवार केला आहे. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना ओपन चॅलेंज देत तुमच्यात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असं आव्हान दिलं आहे. एकूणच माढा लोकसभा मतदार संघामध्ये हे दोन्हीही नेते एकमेकांवर टीका करण्याची एक संधी सोडत नसल्याने युतीची डोकेदुखी वाढलेली पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)

ranjitsinh naik nimbalkar & ramraje naik nimbalkar
Maratha Aarkshan Journey: 175 दिवसांचा संघर्ष, मराठा आरक्षणासाठी आज निर्णायक दिवस; कसा आहे मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा इथपर्यंतचा प्रवास?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com