Cotton Price Issue : शेतक-यांचे नव्हे व्यापाऱ्यांचे सरकार : आमदार के.सी.पाडवी

नंदुरबार जिल्ह्यात रोजगाराच्या संधी नसल्यामुळे नागरिक शेती करण्यावर भर देतात. यावर्षी कापसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
mla k c padvi
mla k c padvisaam tv
Published On

- सागर निकवाडे

Nandurbar News :

सरकार व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी कुठलाही निर्णय घेत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री तथा आमदार के सी पाडवी (mla k c padvi) यांनी साम टीव्हीशी बाेलताना केला. कापूस उत्पादक शेतक-यांना सरकारकडून काेणताच दिलासा मिळत नसल्याचा आराेपही आमदार पाडवी यांनी केला आहे. (Maharashtra News)

नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी पावसाची तूट व अवकाळी पावसामुळे शेतकरी पहिलेच अडचणीत सापडलेला आहे. तसेच कापसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची अडचणीत वाढ होत आहे. शासनाने कापसाला हमीभाव ठरवला आहे मात्र हे भाव देखील कमी असल्यामुळे कापूस शेती करणे हे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परवडणार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

mla k c padvi
Gram Sevak Andolan : ग्रामसेवकांचे बुधवारपासून असहकार आंदाेलन

कापसाचे बी, बीवारे, खत, नेंदणी, पेरणी, मजुरी, डिझेलचे भाव या सर्वात सातत्याने वाढ होत आहे, मात्र शेतकऱ्यांना मिळणारा भाव पुरेसा नसल्यामुळे आता कापसाची शेती कशी करावी असा काही प्रश्न शेतकऱ्यांसमोर उद्भवला आहे.

आजही अनेक शेतकऱ्यांनी भाव वाढण्याच्या अपेक्षेत आपला कापूस घरात साठवून करून ठेवला होता मात्र आता भाव वाढण्याची शक्यता कमीच असल्यामुळे शेतकरी आपला कापूस विक्रीसाठी बाहेर काढू लागले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनसेचा सरकारला इशारा

नंदुरबार जिल्ह्यात रोजगाराच्या संधी नसल्यामुळे अधिक तर नागरिक हे शेतीवर अवलंबून राहतात. यावर्षी शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, शेतकऱ्यांना मदत द्यावी. राज्य सरकार फोडाफोडीचे राजकारणात व्यस्त असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचे दिसत आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी अन्यथा मनसे जिल्हाभरात तीव्र असे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांनी दिला.

शेतक-यांचे नव्हे व्यापाऱ्यांचे सरकार : आमदार के.सी.पाडवी

राज्यातील शेतकरी पूर्वीच दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि त्यानंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे अडचणीत आहेत. सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचे आरोप माजी मंत्री तथा आमदार के सी पाडवी (mla k c padvi latest marathi news) यांनी केला आहे.

हे सरकार फक्त व्यापाऱ्यांच्या सरकार असून शेतकऱ्यांकडे कापूस संपेल शेतकरी कमी भावात आपला कापूस पूर्णपणे विक्री करेल आणि त्यानंतर व्यापाऱ्यांकडे साठवून कर केलेल्या कापसाचे भाव अचानक वाढेल हे सरकार मात्र व्यापाऱ्यांचे फायद्यासाठी कुठलाही निर्णय घेत असल्याचे गंभीर आरोप माजी मंत्री तथा आमदार के सी पाडवी यांनी केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

mla k c padvi
Palghar : वाढवण बंदर विरोधात गुरुवारी चाराेटीत आंदाेलन, संघर्ष समिती राेखणार मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com