महाराष्ट्र

Ashok Dhodi Case : पालघरच्या अशोक धोडी यांच्या हत्येनंतर राजकीय वर्तुळात खळबळ; मुलाने व्यक्त केली मोठी भीती, म्हणाला...

Ashok Dhodi Case News : पालघरच्या शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच्या हत्येनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वडिलांच्या हत्येनंतर मुलाने प्रतिक्रिया दिली. त्याने आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली.

रुपेश पाटील

पालघरमधील शिंदे गटाचे शिवसेना संघटक अशोक धोडी यांच्या हत्येनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धोडी यांचं अपहरण करून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. अपहरणाच्या १२ दिवसांनंतर धोडी यांचा मृतदेह सापडला आहे. वडील धोडी यांच्या हत्येनंतर त्यांच्या मुलाने मोठी भीती व्यक्त केली आहे. आमच्याही जीवाला धोका असल्याची प्रतिक्रिया मुलगा आकाश धोडी यांनी वडिलांच्या हत्येनंतर दिली आहे .

पालघरमधील शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी यांचे १२ दिवसांपूर्वी अपहरण झालं होतं. अपहरणाच्या १२ व्या दिवसानंतर धोडी यांचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये आढळला. त्यांची कार ही गुजराजतच्या एका खदानीत आढळली. कारच्या डिक्कीमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. अशोक धोडी यांच्या हत्येनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या हत्येच्या घटनेनंतर कुटुंबीयांमधील सदस्याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक धोडी यांच्या हत्येनंतर प्रतिक्रिया देताना मुलगा आकाश धोडी यांनी कडक कारवाईची मागणी केली. 'माझ्या वडिलांची हत्या केली. त्या सर्वांना फाशीची शिक्षा व्हावी. तसंच आरोपींपासून आमच्या जीवालाही धोका आहे. फरार असलेल्या आरोपींचा लवकरात लवकर शोध घ्यावा. पोलिसांनी कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करावे, असे मुलगा आकाश धोडी यांनी सांगितले आहे.

'मुख्य आरोपी अविनाश धोडी यांचा लवकरच पोलिसांनी शोध घ्यावा, अन्यथा आमच्या कुटुंबीयांसह आमच्या गावातील नागरिकांना देखील त्यात्यापासून धोका आहे, असेही आकाश यांनी सांगितले.

पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी म्हटलं की, 'अशोक धोडी यांचा मृतदेह शोधण्यात यश आलं आहे. गुजरातच्या सरिग्राम येथून बंद दगड खाणीतून पालघर पोलिसांकडून अशोक धोडी यांचा मृतदेह आणि त्यांची कार बाहेर काढण्यात यश आलं आहे. अपहरण आणि हत्या प्रकरणात अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडीच मुख्य सूत्रधार आरोपी आहे. या प्रकरणातील चार आरोपींना अटक केली आहे. तर फरार तीन आरोपींचा शोध सुरू आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT