Kharghar Crime News : मित्रानेच केली मित्राची हत्या; पार्टीसाठी पैसे न दिल्यातून वाद

Navi Mumbai News : मन्नू पार्टीसाठी पैसे देत नसल्याच्या करणावरून जयेश आणि मन्नू या दोन मित्रांमध्ये वाद सुरु झाला. वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि हाणामारी पर्यंत गेले होते
Kharghar Crime News
Kharghar Crime NewsSaam tv
Published On

सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : मित्र- मित्र मिळून पार्टी करण्याचे नियोजन आखले. चिकन पार्टी करण्याचे ठरले मात्र यासाठी एकाने वर्गणी दिली नव्हती. दरम्यान या चिकन पार्टीसाठी पैसे न दिल्याने मित्रांमध्ये वाद निर्माण झाला. या वादातून खारघरमधील बेलपाडा आदिवासी वाडी येथील क्रिकेटच्या मैदानाजवळ लाकडी बॅटने चेहऱ्यावर आणि पाठीवर जोरदार प्रहार करून एका मित्राने मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

नवी मुंबईच्या खारघर परिसरातील बेलपाडा येथील क्रिकेटच्या मैदानाच्या बाजूला जयेश वाघ आणि त्याचे इतर मित्र चिकन बनवत होते. यावेळी मन्नू शर्मा या मित्राकडून चिकन पार्टीसाठी कोणतीही वर्गणी अद्याप देण्यात आलेली नव्हती. मन्नू पार्टीसाठी पैसे देत नसल्याच्या करणावरून जयेश आणि मन्नू या दोन मित्रांमध्ये वाद सुरु झाला. वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि हाणामारी पर्यंत गेले होते. 

Kharghar Crime News
Ambernath Crime: अंबरनाथमध्ये शिक्षकांची फ्री स्टाईल हाणामारी, शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप; VIDEO व्हायरल

वादातून बॅटने केली मारहाण 

दरम्यान या वादात जयेशने मन्नू याला कानशिलात लगावली. याचा राग आल्याने मन्नू याने जयेशला प्रथम हाताबुक्क्याने मारहाण केली. नंतर थेट क्रिकेटच्या बॅटने डोक्यावर आणि पाठीवर मारहाण केल्याने जयेश हा गंभीर जखमी झाला होता. जयेशला जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. सदरच्या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली होती. 

Kharghar Crime News
Red Radish Farming : लाल मुळ्याची आता सातपुड्यात होणार शेती; नंदुरबारच्या कृषी विज्ञान केंद्रात लाल मुळ्याचा यशस्वी प्रयोग

हत्येचा गुन्हा दाखल करत संशयिताला अटक 

याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात मन्नू शर्मा याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. एकूणच चिकनच्या पार्टीसाठी वर्गणी न देण्यावरून सुरु झालेल्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राची हत्या केल्याचे समोर आली आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com