Ambernath Crime: अंबरनाथमध्ये शिक्षकांची फ्री स्टाईल हाणामारी, शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप; VIDEO व्हायरल

Ambernath CCTV Video: अंबरनाथमध्ये शिक्षकांची फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. अंबरनाथ पश्चिम येथील जावसई फुलेनगर भागात हिंदी माध्यमाच्या शाळेसमोर हा प्रकार घडला. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Ambernath Crime: अंबरनाथमध्ये शिक्षकांची फ्री स्टाईल हाणामारी, शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप; घटनेचा CCTV व्हिडीओ व्हायरल
Ambernath CrimeSaam Tv
Published On

अजय दुधाणे, अंबरनाथ

अंबरनाथमध्ये शिक्षकांची शाळेबाहेर फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. महिला आणि पुरुष शिक्षकांमध्ये वाद झाला आणि त्यांनी एकमेकांना मारहाण केली. शिक्षकाने शरीर सुखाची मागणी केल्याने त्याला मारहाण केल्याचा शिक्षिकेने दावा केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मारहाणीमध्ये शिक्षिका जखमी झाली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पश्चिम येथील जावसई फुलेनगर भागात हिंदी माध्यमाची शाळा आहे. या शाळेत एक शिक्षिका गेल्या २९ वर्षांपासून कार्यरत आहे. त्यांच्या पतीचं निधन झालं असून त्या घरातील एकमेव कमावत्या व्यक्ती आहेत. बुधवारी २९ जानेवारी रोजी त्यांनी त्यांच्या वर्गातील मुलांना पीटीच्या तासासाठी बाहेर खेळण्यासाठी सोडलं असताना त्याच शाळेतील शिक्षकाने या मुलांचा व्हिडिओ काढला. यानंतर शाळा सुटल्यावर ही शिक्षिका शाळेबाहेर पालकांशी बोलत उभी असताना हा शिक्षक दुचाकीवरून तिथे आला आणि त्याने आपल्याला बोलावत आपल्याकडे थेट शरीरसुखाची मागणी केली, असा आरोप शिक्षिकेने केला आहे.

Ambernath Crime: अंबरनाथमध्ये शिक्षकांची फ्री स्टाईल हाणामारी, शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप; घटनेचा CCTV व्हिडीओ व्हायरल
Pune Crime News : पुण्यात खूनी खेळ, कोयता गँगची दहशत कायम; दिवसाढवळ्या चौघांनी सपासप वार करत तरुणाला संपवलं

शिक्षकाने शरीरसुखाची मागणी केल्यामुळे शिक्षिका संतापली. तिने या शिक्षकाच्या कानशिलात लगावली. यानंतर दोन्ही शिक्षकांमध्ये शाळेबाहेरच फ्री स्टाईल हाणामारी झाली. ही हाणामारी सोडवण्यासाठी या शाळेतील शिक्षिका आणि या शिक्षकाची पुतणी आली आणि त्यांनीही आपल्याला शिवीगाळ केली, असा आरोप शिक्षिकेने केला आहे.

इतकंच नाही तर मला गेल्या २ वर्षांपासून त्रास दिला जात असून मी नोकरी सोडावी आणि संस्थाचालकांच्या नातेवाईकाला माझ्या जागी लावता यावं, हा त्यामागचा हेतू असल्याचा आरोप शिक्षिकेने केला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षिकेला दिलेली एक नोटीसही तिने दाखवली असून त्यात मुख्याध्यापकांनी थेट त्यांच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला.

Ambernath Crime: अंबरनाथमध्ये शिक्षकांची फ्री स्टाईल हाणामारी, शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप; घटनेचा CCTV व्हिडीओ व्हायरल
Jalna Crime News: दारूच्या नशेत पतीनं उचललं टोकाचं पाऊल, गळा आवळून पत्नीची केली हत्या

तर दुसरीकडे या पीडित शिक्षिकेचे हे आरोप शिक्षकाच्या पुतणीने फेटाळले आहेत. मी फक्त भांडण सोडवण्यासाठी गेली असून ते सीसीटीव्हीत दिसत असतानाही माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचे त्या म्हणाल्या. पीडित शिक्षिकेने आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला. इतक्यावरच न थांबता पीडित शिक्षिकेच्या चारित्र्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत एक धक्कादायक विधान केले.

Ambernath Crime: अंबरनाथमध्ये शिक्षकांची फ्री स्टाईल हाणामारी, शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप; घटनेचा CCTV व्हिडीओ व्हायरल
Mumbai Crime : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, २० वर्षे राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना अटक

मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या मारहाणीत पीडित शिक्षेकेच्या चेहऱ्याला आणि डोळ्याला दुखापत झाली असून त्यांच्या फिर्यादीवरून अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षिका यांच्याविरोधात विनयभंग, दुखापत करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी दिली आहे.

Ambernath Crime: अंबरनाथमध्ये शिक्षकांची फ्री स्टाईल हाणामारी, शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप; घटनेचा CCTV व्हिडीओ व्हायरल
Jalgaon Crime : उसनवारीने दिलेले पैसे मागितल्याने जीवे मारण्याची धमकी; एक लाख घेत फसवणूक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com