Red Radish Farming : लाल मुळ्याची आता सातपुड्यात होणार शेती; नंदुरबारच्या कृषी विज्ञान केंद्रात लाल मुळ्याचा यशस्वी प्रयोग

Nandurbar News : लाल मुळ्याची ओळख फ्रेंच मुळा म्हणून आहे. जो उच्च श्रेणीची भाजी आहे. त्यात अधिक अँटिऑक्सिडेंट आणि अँटीकार्सिनोजेनिक गुणधर्म आहेत. जे पांढऱ्या मुळ्यापेक्षा लाल मुळ्याला खास बनवते
Red Radish
Red RadishSaam tv
Published On

सागर निकवाडे

नंदुरबार : विदेशात पिकवल्या जाणाऱ्या पालेभाज्या आता भारतात सुद्धा पिकवल्या जात आहेत. त्यातच नंदुरबार सारख्या जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्रात या विदेशी पालेभाज्यांच्या यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. आपल्याकडे प्रामुख्याने पांढरा मुळा हा खाण्यासाठी वापरतो. मात्र, लाल मुळा हा फारच कमी लोकांनी पाहिला असेल. या लाल मुळ्याची लागवड अनेकांना आश्चर्यचकित करू शकते. अशा या लाल मुळ्याची शेती नंदुरबार तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्रात प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली आहे. 

लाल मुळ्याची ओळख  फ्रेंच मुळा म्हणून आहे. जो उच्च श्रेणीची भाजी आहे. त्यात अधिक अँटिऑक्सिडेंट आणि अँटीकार्सिनोजेनिक गुणधर्म आहेत. जे पांढऱ्या मुळ्यापेक्षा लाल मुळ्याला खास बनवते. लाल मुळ्याची चव हलकी तिखट असते. हे मुळे गडद लाल रंगाची असतात आणि पाने गडद हिरव्या रंगाची असतात. लाल रंगामुळे ते दिसायला सुंदर आहे. लाल मुळ्याच्या वापराने कोशिंबीर पौष्टिक असण्यासोबतच दिसायलाही चांगली होते.

Red Radish
Electric Shock : शेतात पिकांना पाणी देताना घडले दुर्दैवी; दोन शेतमजुरांचा मृत्यू

एकरी ५४ क्विंटल पर्यंत उत्पादन 
लाल मुळ्याची लागवडीसाठी डिसेंबर ते फेब्रुवारी हा महिना अतिशय योग्य मानला जातो. लागवडीसाठी निचरा होणारी जमिन उत्तम मानली जाते. जमिनीचा सामू ५ ते ७.५ च्या दरम्यान असावा लागतो. लाल मुळ्याची लागवड बियांची पेरणी करुन किंवा नर्सरीत रोपे वाढवूनही करता येते. पेरणीसाठी सुमारे ८ ते १० किलो बियाणे लागते. व्यावसायिक लागवडीसाठी रोपवाटिक वाढवलेल्या सुधारित वाणांची निवड करावी. पेरणीनंतर साधारण २० ते ४० दिवस लागतात. एकरी ५४ क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळू शकते.

Red Radish
Nandgaon Accident : भरधाव कार दुचाकीला धडकली, भीषण अपघातात पतीसह पत्नीचा मृत्यू

कमी काळात अधिक उत्पादन 

शेती व्यवसयातून केवळ मुख्य पिकातूनच उत्पन्न मिळते असे नाही. काळाच्या ओघात पीक पध्दतीमध्ये बदल होत आहे. शेतकरी हे देखील नगदी पिकावरच भर देत आहे. भाजीपाल्याच्या लागवडीतून कमी काळात अधिकचे उत्पन्न हे सहज शक्य असल्याची माहिती नंदुरबार कृषी विज्ञान केंद्राचे कृषी तज्ञ डॉ वैभव गुरवे यांनी दिली आहे.

प्रतिकिलो १०० रुपयांपर्यंत दर 

लाल मुळा हा पांढऱ्या मुळ्या प्रमाणेच असतो. या मुळ्याची चव देखील पांढऱ्या मुळासारखीच असते. त्याचबरोबर यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आढळतात. जिथे बाजारात सामान्य मुळा १० ते २० रुपये किलोने भाव मिळतो. त्यातच हा लाल मुळा मात्र ८० ते १०० रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. यामुळे लाल मुळ्याची शेती केल्यास तसेच या पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास त्यातून चांगला नफा मिळवता येतो. शेतकऱ्यांनी लागवड केल्यास त्यांना सामान्य मुळ्यापेक्षा अधिक नफा मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com