Electric Shock : शेतात पिकांना पाणी देताना घडले दुर्दैवी; दोन शेतमजुरांचा मृत्यू

Dharashiv News : पाटचार्याना पाणी आल्याने शेतकरी शेतातील पिकांना पाणी देण्याचे काम करत आहेत. तर उमरगा तालुक्यात घडलेल्या घटनेत तलावाजवळ शेतात पाणी देताना विजेचा करंट लागून ही दुर्देवी घटना घडली
Electric Shock
Electric ShockSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : रब्बी हंगामात लागवड करण्यात आलेल्या पिकांना पाणी देण्याचे काम आता शेतकरी करू लागला आहे. दरम्यान धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील बलसुर शिवारात ज्वारी पिकाला पाणी देण्याचे काम शेतमजुरांकडून केले जात होते. पिकांना पाणी भरत असताना विजेचा जोरदार झटका बसल्याने दोन शेतमजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

शेतात काम करत असताना व्यंकट बालकुंदे (वय ५९) व खुरशीद बडगिरे (वय ६७) असे मृत झालेल्या दोन शेतमजुरांचा मृत्यू झाला आहे. सध्या रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी पाटचाऱ्याना पाणी सोडण्यात आले आहे. पाटचार्याना पाणी आल्याने शेतकरी शेतातील पिकांना पाणी देण्याचे काम करत आहेत. तर उमरगा तालुक्यात घडलेल्या घटनेत तलावाजवळ शेतात पाणी देताना विजेचा करंट लागून ही दुर्देवी घटना घडली आहे. 

Electric Shock
Bird Flu : उदगीरमध्ये बर्ड फ्लूचा धोका वाढला; शेकडो कोंबड्यांचा मृत्यू, परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित

पाणी भरताना लागला विजेचा झटका 

उमरगा तालुक्यातील बलसुर गावच्या शिवारातील शेतात ज्वारी पिकाला पाणी भरण्यासाठी व्यंकट बालकुंदे व खुरशीद बडगिरे हे दोघेजण गेले होते. पाणी भरत असताना जवळूनच गेलेल्या विद्युत वायरला स्पर्श झाला. यात जमीन पाण्याने ओली असल्याने विजेचा जोरदार झटका बसला. यामध्ये व्यंकट बालकुंदे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत काम करत असलेले खुर्शीद बडगिरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

Electric Shock
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत परराज्यातील बोगस लाभार्थ्यांचे रॅकेट; ११७१ बोगस लाभार्थी

परिसरात खळबळ 

शेतशिवारात सदरची घटना घडल्याने यात दोन शेतमजुरांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. घटनेबाबत गावात माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. तर याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल असून त्यांनी घटनेचा पंचनामा केला. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com