Ashok Dhodi Kidnapping Case: खदानीत सापडलेल्या कारमधील मृतदेह शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींचाच!

Ashok Dhodi Kidnapping Case: अशोक धोडी हे गेल्या १२ दिवसांपासून बेपत्ता आहेत. आज एक कार पोलिसांना सापडलीय. ही कार धोडी यांची असल्याचा संशय पालघर पोलिसांना आहे.
Ashok Dhodi
Ashok Dhodi Kidnapping CaseSaam Tv
Published On

रुपेश पाटील, साम प्रतिनिधी

शिंदे गट शिवसेनेचे संघटक अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. पदाधिकारी धोडी यांचे अपहरण होऊन त्यांची हत्या झाली असावा असा संशय पोलिसांना आहे. आज अपहरण झाल्याच्या १२ व्या दिवशी पालघर पोलिसांना गुजरातमध्ये ब्रेजा कार सापडली. या कारच्या डिकीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळलाय. हा मृतदेह कोणाचा याबाबत तपास केला जात आहे.

दुश्यम सारखा थरार

अजय देवगनच्या दृश्यम चित्रपटातील सीनप्रमाणे धोडी यांची कार एका दगड खदानी फेकून देण्यात आली. पोलिसाना दगड खदानीत कार दिसून आल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने ही कार बाहेर काढण्यात आली. त्या कारच्या डिकीमध्ये मृतदेह आढळला. हे दृश्य पाहिल्यानंतर दृश्यम चित्रपटातील सीन आठवला. अवैध दारुच्या तस्कारीच्या विरोधात असलेले अशोक धोडी २० जानेवारीला आपल्या कारमधून डहाणूहून घरी येत होते. कार चालवत असताना धोडी आपल्या पत्नीसोबत बोलत होते.

Ashok Dhodi
Pune Crime: मध्य प्रदेशातून पुण्यात येऊन करायचा चोऱ्या, पोलिसांनी १५० सीसीटीव्ही तपाले, अशा आवळ्या सोनसाखळी चोराच्या मुसक्या

आपण डाहाणूमधून निघालो आहोत, याची माहिती त्यांनी पत्नीला दिली. वाटेतच त्यांचा फोन बंद झाला. डहाणूहून निघाल्यानंतर धोडी यांची कार रस्त्यातील एका घाटामध्ये अडवण्यात आली होती. त्या ठिकाणी गाडीच्या काचेचे अवशेष त्याचबरोबर काही खाणाखुणा सापडल्या होत्या. अशोक धोडी यांची कार अडवण्यासाठी एक आयशर टेम्पो आणि एका पिकपचाही वापर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान धोडी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. डाहाणूच्या रस्त्यावरील सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस त्यांचा कारचा शोध घेऊ लागले.

Ashok Dhodi
Pune Crime: कलंक! हुक्का पार्लर चालकाकडून पोलीस उपनिरीक्षकच घेत होता हफ्ता; लाचखोरी प्रकरणाचा पर्दाफाश

तपास गुजरातच्या दिशेने

पोलिसांनी डाहाणूच्या रस्त्यावरील सीसीटीव्हीद्वारे धोडी यांच्या कारचा तपास सुरू केला. तपासात पोलिसांना गुजरातमधील एका बंद पडलेल्या दगड खदानीत कार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढण्यात आली त्यात एक मृतदेह आढळून आलाय. हा मृतदेह धोडी असल्याचं सांगितलं जात आहे.

का झाली हत्या?

शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी यांची अपहरणानंतर हत्या झाल्याचं म्हटलं जात आहे. महाराष्ट्र सिमेलगत असलेल्या गुजरात मधील भिलाडजवळ बंद असलेल्या दगड खाणीत कारसह मृतदेह फेकला होता अशी माहिती पोलिसांनी दिलीय. गुजरातमधील नगाम येथे कारसह कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडालीय. अशोक धोडी बारा दिवसांपासून बेपत्ता होते.

याप्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आलीय आहे. तर पाच आरोपी अजूनही फरार आहेत. दारू तस्करीच्या वादातून अशोक धोडी यांचा अपहरण आणि हत्या करण्यात आली असावा माहिती सुत्रांनी दिलीय. अवैध दारू तस्करी करताना अशोक धोडी अडचण ठरत असल्याने अपहरण आणि हत्या झाल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com