श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Manasvi Choudhary

श्रावण

श्रावण महिना म्हटलं की उपवासाचे पदार्थासोबत चमचमीत पदार्थ बनवले जातात. श्रावण आणि अळुवडी हे समीकरण ठरलेलं आहे.

Shravan Special Malvani Style Alu Vadi Recipe | Google

श्रावण आणि अळुवडी हे समीकरण

श्रावणात एकदा तरी घरी अळुवडी बनवली जाते. तुम्हालाही अळुवडी बनवायची असेल तर ही युनिक रेसिपी ट्राय करा.

Shravan Special Malvani Style Alu Vadi Recipe | Google

मालवणी स्टाईल अळुवडी

मालवणी स्टाईल अळुची वडी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने ही रेसिपी ट्राय करू शकता.

Shravan Special Malvani Style Alu Vadi Recipe | Google

साहित्य

अळुवडी बनवण्यासाठी अळुची पाने, बेसन, तांदूळ, चिंच, गूळ, मालवणी मसाला, तिखट मसाला, मिरची लसूण पेस्ट, कांदा, कोथिंबीर हे साहित्य एकत्र घ्या.

Shravan Special Malvani Style Alu Vadi Recipe | Canva

अळुची पाने स्वच्छ धुवून घ्या

सर्वातआधी अळूची पाने स्वच्छ धुऊन त्याची देठं काढून जाड शिरा कापून घ्या. नंतर त्या शिरावर लाटणे फिरवून घ्या.

Alu Leaves

मसाले मिक्स करा

एका बाऊलमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, धने जीरे पूड, तिखट, मीठ, हिंग, हळद, तीळ, कोथिंबीर, मिरची व लसणाची पेस्ट सर्व साहित्य घालून मिक्स करा.

Spicy spices

चिंच मिक्स करा

या मिश्रणात चिंच व गूळ मिक्स करून घ्या मिश्रणात थोडे पाणी मिक्स करा.

Shravan Special Malvani Style Alu Vadi Recipe

अळुची पानांवर मिश्रण लावा

आळुचे पान घ्या पानावर बॅटर थोडे पसरवून घ्या. मग त्यावर दुसरे पान उलट बाजूला टोक करून ठेवा व त्यावर परत बॅटर पसरवून घ्या. असे चार पाने एकावर एक ठेवून बॅटर लावून घेतले.

Shravan Special Malvani Style Alu Vadi Recipe | Google

पानांचा रोल करा

नंतर दोन्ही साईड ने थोडे फोल्ड करून त्यावर थोडे बॅटर लावा. नंतर खालची व वरची बाजू थोडी फोल्ड करून त्यावर बॅटर पसरवा.

Alu Vadi Recipe | Google

वडीला रोल लावा

आता त्याचा घट्ट रोल तयार करून त्याला दोरा गुंडाळून घ्या म्हणजे रोल सुटत नाही. आणि १०-१२ मिनिट तो इडलीच्या भांड्यात वाफवून घ्या.

Shravan Special Malvani Style Alu Vadi Recipe | google

वड्या तळून घ्या

वाफवलेला रोल थंड झाल्यावर त्याचा धागा सोडून त्याचे छोटे तुकडे करा. नंतर कढईत वड्या तळून घ्या.

Shravan Special Malvani Style Alu Vadi Recipe | Google

NEXT: शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Pomegranate Fruit Benefits To Increase Blood Hemoglobin
येथे क्लिक करा..