Devendra Fadnavis on Sabha Election 2024 saam tv
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024: शिवसेना-भाजप लोकसभेच्या जागावाटपाबाबत फडणवीस यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

Shiv Sena Bjp Alliance: शिवसेना-भाजप लोकसभेच्या जागावाटपाबाबत फडणवीस यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

साम टिव्ही ब्युरो

>> बालाजी सुरवसे

Devendra Fadnavis on Sabha Election 2024: राज्यात शिवसेना आणि भाजप युतीमध्ये मिठाचा खडा पडला असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणूक २०२४ संदर्भात वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपण निवडणूक लढवावी असे वाटत असते. त्यात काहीच वावगे नाही. ''

ते म्हणाले, ''शिंदे आणि भाजप एकत्रित या राज्यात सरकार चालवत आहोत.आम्हाला येणाऱ्या काळात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवायचं आहे. त्यामुळे आम्ही याबाबत कोण कुठली जागा लढवायची, हे वस्तुस्थिती पाहून निर्णय घेऊन ठरणार.'' धाराशिव येथे माध्यमांशी बोलताना ते असं म्हणाले आहेत.

'पुढील वीस वर्षे नरेंद्र मोदी यांनी देशाची सेवा करावी'

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''लोक आपापल्या शुभेच्छा व्यक्त करत असतात. पण मी ज्या जागी आहे, त्या जागी समाधानी महाराष्ट्राची सेवा करणे हे महत्वाचं आहे.'' (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, ''देशाचे नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व सक्षम असून पुढील वीस वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सेवा करावी, असं मला वाटतं.''

धाराशिवमधील रेल्वे प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, रेल्वेचा संघर्ष खूप वर्षापासून चालू होता, तो थांबणार असून लवकरच रेल्वे देखील सुरू होईल. फडणवीस म्हणाले, ''कृष्णा मराठवाडा प्रकल्पामुळे २४००० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार ,आम्ही त्याला साडेआठ हजार कोटी रुपयांची मान्यता दिली. निधीही उपलब्ध करून दिला. मराठवाड्याचा तहान भागवण्याचा प्रयत्न यातून आम्ही केलाय तो लवकर पूर्ण होईल.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: वारंवार फेस क्लिनअप करायची सवय आहे? एकदा जाणून घ्या क्लिनअपचे फायदे आणि नुकसान

Anant Chaturdashi 2025 live updates : उत्तराखंड मधील ‘शिव महिमा’ नृत्य कलाकार ठरले...गणेश मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

SCROLL FOR NEXT