Weather Forecast : पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आणि तिकडे विदर्भात २ दिवस उष्णतेची लाट; हवामान खात्याचा अंदाज

Heat Wave : ऊन आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे.
Heat Wave
Heat WaveSaam Tv
Published On

Nagpur News : जून महिन्याचे 15 दिवस उलटून देखील राज्यातील अनेक भागात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. एकीकडे नागरिक पावसाची वाट पाहत असताना हवामान विभागने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

जून महिन्याचा दुसरा आठवडा ओलांडला तरी विदर्भात मान्सूनचा पत्ता नाही. त्यात पुढील काही दिवस विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ऊन आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे.

हवामान विभागाने पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे . जून दुसऱ्या आठवड्यात मान्सून पूर्व वातावरण निर्माण होऊन पाऊस पडल्याने तापमान कमी होत असते. (Latest Marathi News)

Heat Wave
Nagpur Crime News: मुलीच्या पोटात दुखत होते म्हणून आईने डॉक्टरकडे नेले, तपासणी केल्यानंतर सगळेच हादरले...

सन्सस्ट्रोकची शक्यता

मात्र यंदा मान्सून पूर्व पाऊस न झाल्याने वातावरण सरासरीपेक्षा अधिक उष्ण आहे. या परिस्थितीमुळे सन्सट्रोक होण्याची अधिक शक्यता आहे. नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असं  नागपूर हवामान विभागाचे उपसंचालक एम एल साहू यांनी म्हटलं आहे.

Heat Wave
Pune News : शिक्षण विभागाने घेतली गंभीर दखल, शेठ केशरचंद पारख स्कूलच्या व्यवस्थापनाची चाैकशी हाेणार, आज मनसेनं छेडलं आंदाेलन

पेरण्या न करण्याचं आवाहन

बिपरजॅाय चक्रीवादळामुळे मॅान्सूनवर परिणाम झाला आहे. मॅान्सून लांबल्याने खरीप पेरणीचं नियोजन बिघडण्याची शक्यता आहे. २० जूननंतर विदर्भात मॅान्सून येण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांना पेरणी न करण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com