Pune News : शिक्षण विभागाने घेतली गंभीर दखल, शेठ केशरचंद पारख स्कूलच्या व्यवस्थापनाची चाैकशी हाेणार, आज मनसेनं छेडलं आंदाेलन

पुन्हा असा प्रकार घडल्यास मनसे स्टाईल आंदाेलन छेडू असा इशारा दिला.
pune news, school reopen, rajgurunagar, school , students, parents, mns
pune news, school reopen, rajgurunagar, school , students, parents, mnssaam tv
Published On

Pune News : पुण्यातील राजगुरुनगर येथील शेठ केशरचंद पारख या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या व्यवस्थापना विराेधात आज (शुक्रवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (maharashtra navnirman sena) शाळेच्या प्रवेशद्वारा समाेर आंदाेलन (aandolan) छेडले. यावेळी मनसैनिकांच्या घाेषणांनी परिसर दणाणून गेला. (Maharashtra News)

pune news, school reopen, rajgurunagar, school , students, parents, mns
Vasota Fort News : दूर्गप्रेमींनाे ! वासोटा किल्ला आजपासून पर्यटनासाठी बंद; जाणून घ्या कारण

विद्यार्थ्यांनी गतवर्षीचे शैक्षणिक शुल्क न भरल्यामुळे त्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच (school reopens in maharashtra) शाळा व्यवस्थापनाने वर्गाबाहेर ठेवले. त्यामुळे शाळा परिसरातील आवारात कडक उन्हात विद्यार्थ्यांना बसावे लागले. या शिक्षेमुळे विद्यार्थ्या हिरमुसले हाेते. हा प्रकार समजताच पालकांचा पारा चढला. काहींनी शाळा परिसरात येऊन व्यवस्थापनावर आगपाखड केली.

आज या प्रकाराचा मनसेने निषेध नाेंदवित शाळेच्या बाहेर आंदाेलन छेडले. यावेळी मनसैनिकांनी चाैकशीत सत्य बाहेर येईलच परंतु पुन्हा आर्थिक कारणावरुन विद्यार्थ्यांना अपमानित केले गेले तर मनसे स्टाईल आंदाेलन छेडू असा इशारा दिला.

pune news, school reopen, rajgurunagar, school , students, parents, mns
Success Story : कष्टकरी कुटुंबातील युक्ताला Youtube ची मिळाली साथ, Neet परीक्षेत मिळविले उज्जवल यश

दरम्यान शाळेची फी हा विषय विद्यार्थीशी निगडीत नसताना मुलांना वेठीस ठेवणे गैर असल्याची भावना गटशिक्षण आधिकारी यांनी व्यक्त केली. या प्रकरणाची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकाराची त्रिसदस्यांच्या माध्यमातून शाळा व्यवस्थापनाची चौकशीचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.

Byte :- नितीन ताठे :- पालकEdited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com