Mumbai Local Train Crime: मुंबई लोकल महिलांसाठी असुरक्षित? एकाच दिवशी 5 महिलांचा विनयभंग, सीसीटीव्हीत घटना कैद

Mumbai Crime News: मुंबई लोकल महिलांसाठी असुरक्षित? एकाच दिवशी 5 महिलांचा विनयभंग
Mumbai Local Train Crime
Mumbai Local Train CrimeSaam TV
Published On

Mumbai Local Train Crime: लोकल म्हणजे मुंबईची लाईफलाईन. रोज लाखो लोक यातून प्रवास करतात. मात्र आता हीच लोकल ट्रेन महिलांसाठी असुरक्षित झाली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच कारण म्हणजे मुंबई लोकलमध्ये एकाच दिवशी पाच महिलांचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे.

बुधवारी सकाळी ७.३० वाजता सीएसएमटीहून पनवेलकडे जाणाऱ्या मुंबई लोकल ट्रेनमध्ये २० वर्षीय तरुणी परीक्षा देण्यासाठी जात होती. सेकंड क्लासच्या महिला डब्यात तिला एकटी पाहून एक व्यक्ती मस्जिद बंदर स्टेशनमध्ये घुसला आणि तिचा विनयभंग केला.

Mumbai Local Train Crime
Nawab Malik News: नवाब मलिक यांची अवस्था गंभीर; त्यांना नेमकं झालंय काय? वकिलांनी कोर्टात दिली सर्व माहिती

घटनेच्या पाच-सहा तासांत सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी नवाज करीम शेख याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. आता त्याच दिवशी त्याने इतर पाच महिलांसोबतही घाणेरडे कृत्य केल्याचे समोर आले आहे. (Latest Marathi News)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी नवाज करीम शेख हा तेथील पाच वेगवेगळ्या महिलांसोबत वेगवेगळ्या पद्धतीने कसा गैरकृत्य करत होता, हे दिसत आहे.

Mumbai Local Train Crime
Weather Forecast : पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आणि तिकडे विदर्भात २ दिवस उष्णतेची लाट; हवामान खात्याचा अंदाज

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मस्जिद बंदर स्थानकात विद्यार्थिनीचा विनयभंग झाला, त्या दिवशी नवाजने इतर पाच महिलांचा विनयभंग केल्याचा पुरावा समोर आला आहे. विशेष म्हणजे सीएसएमटी स्टेशनवर नवाज करीमचे हे घृणास्पद कृत्य पाहून आजूबाजूला कोणीही त्याला अडवले नाही. सीसीटीव्हीमध्ये तो एका महिलेच्या अंगाला आपल्या हाताच्या कोपऱ्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना दिसत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपी नवाज करीम शेख याने असे कृत्य पहिल्यांदाच केले नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. यापूर्वीही तो असे प्रकार करत आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com