Shirdi Sai Sansthan Saam tv
महाराष्ट्र

Shirdi Sai Sansthan : शनी शिंगणापूरनंतर साई संस्थानच्या नावाने बनावट वेबसाईट; भाविकांची आर्थिक फसवणुक केल्याचे उघड

Shirdi News : बनावट वेबसाईटच्या माध्यमातून अनेक साईभक्तांची रूम बुकिंग, देणगी आणि दर्शनाच्या नावाने फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. साईबाबा संस्थानने याची दखल घेऊन कठोर कारवाईची मागणी होत आहे

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहिल्यानगर) : शनी शिंगणापूर येथे बनावट वेबसाईटचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता शिर्डी साईसंस्थानच्या नावाशी साधर्म्य असलेली बनावट वेबसाईट तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या माध्यमातून भाविकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी साईबाबा संस्थानने स्वतः पुढाकार घेऊन कठोर कायवाई करण्याची मागणी केली आहे.

साई दर्शनासाठी शिर्डीत वर्षाकाठी करोडो तर दररोज हजारो भाविक येत असतात. अनेक भाविक वास्तव्यासाठी साई संस्थानच्या भक्त निवासाला प्राधान्य देतात. अर्थात असुविधा टाळण्यासाठी भाविक शक्यतो साई संस्थानच्या ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन रूम बुकिंग करतात. मात्र याचाच गैरफायदा काही अपप्रवृत्तींनी घेतला असून साईसंस्थान भक्तनिवासाच्या नावाने बनावट वेबसाईट बनवण्यात आल्याचे समोर आले आहेत. 

ऑनलाईन रूम बुकिंग 

दरम्यान मागील काही दिवसांपासून बनावट वेबसाईटच्या माध्यमातून भाविकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कर्नाटक राज्यातील रामू जाधव या भाविकासोबत असाच फसवणुकीचा प्रकार घडला आहे. रामू जाधव यांच्या नातवाचा वाढदिवस असल्याने ते कुटुंबासह साई दर्शनाला शिर्डीकडे निघाले. त्यांच्या मुलाने वास्तव्यासाठी गुगलवर जाऊन शिर्डी भक्तनिवास सर्च केल्यानंतर साईसंस्थान भक्तनिवास नावाने एक वेबसाईट निदर्शनास आली. 

असा उघड झाला प्रकार 

साईसंस्थानची अधिकृत वेबसाई समजून त्याने रूम बुकिंगसाठी विचारणा केली असता त्याला व्हॉट्सॲपवर एक स्कॅनर आले. त्यावर पेमेंट केल्यानंतर संबंधिताने तुम्ही भक्त निवासाच्या काउंटरवर आल्यावर पावती देतो असे सांगितले. मात्र ज्यावेळी जाधव कुटुंब शिर्डीत साई संस्थानच्या भक्तनिवासात पोहचले, तेव्हा आपल्या नावे बुकिंगच नसल्याचे समजले. गोंधळलेल्या जाधव यांना साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी धीर देत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर साईभक्तांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये रामकुंडावर छटपूजेदरम्यान परप्रांतीयांमध्ये हाणामारी|VIDEO

Aaditya Thackeray : वरळीत १९ हजार ३३३ मतदार गडबडीतले आहेत; निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरेंनी मोठा बॉम्ब टाकला

Maharashtra Live News Update: डॉक्टर निर्भया प्रकरणातील आरोपींना कठोर शासन व्हावे, उद्या वडवणी शहर बंदची हाक

Bhopalyache Appe Recipe : भोपळ्याची नावडती भाजी होईल आवडती, झटपट नाश्त्याला बनवा खमंग आप्पे

Shehnaaz Gill: सुकून भी गुलाबी होता है...; शहनाज गीलचा नवा गुलाबी लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT