Accident News : बसमधून खाली उतरताच घडले भयानक; घराजवळच महिलेला एसटीने चिरडले

Sangli News : आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेचा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. घराजवळच महिलेवर काळाने झडप घातली
Accident News
Accident NewsSaam tv
Published On

सांगली : कोल्हापूर येथून बसने घरी परतलेल्या महिलेवर काळाने झडप घातली आहे. बसमधून प्रवास करत आल्यानंतर बसथांब्यावर महिला उतरली. मात्र बसमधून उतरल्यानंतर रस्त्याच्या बाजूने जात असताना त्याच बसने धडक देत महिलेला चिरडले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सांगली शहरात घडली आहे. काही अंतरावरच घर असताना काळाने झडप घातली आहे. 

सांगली शहरातील आकाशवाणी येथे घडलेल्या अपघातात शीतल प्रकाश आंब्रे (वय ४१) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या महिलेचा प्रशासकीय अनास्थेमुळे बळी गेला आहे. शीतल आंब्रे या कामानिमित्त कोल्हापूरला गेल्या होत्या. काम आटोपल्यानंतर कोल्हापूर येथील सायंकाळी पुन्हा आपल्या घरी एसटीने प्रवास करत येत होत्या. 

Accident News
Good news for Mumbaikars! मुंबईत आजपासून धावणार ई-बाईक , तिकिट फक्त 15 रुपये, वाचा सविस्तर

एसटीतुन उतरल्यानंतर त्याच बसची धडक 

दरम्यान सांगली शहरातील आकाशवाणीजवळील थांब्यावर त्या एसटीतून उतरल्या. मात्र एसटी थांबली त्याठिकाणी रस्त्यावर पावसाचे पाणी असल्याने त्या बाजूने घराकडे निघाल्या होत्या. याचवेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. ज्या एसटीने त्यांनी प्रवास केला त्याच एसटीची धडक बसल्याने त्या खाली कोसळल्या. यात त्यांचा मृत्यू झाला. सदर घटना रात्री आठच्या सुमारास सांगलीतील आकाशवाणी केंद्रासमोर घडली. 

Accident News
Heavy Rain : पाथर्डीत तालुक्यात अतिवृष्टीचा कहर; करंजी परिसरातील अनेकांचे संसार उघड्यावर, शेतीचेही मोठे नुकसान

मुंबई- पुणे महामार्गावर तरुणाचा जागीच मृत्यू
मावळ : जुने मुंबई- पुणे महामार्गावरील जांभूळ फाटा येथील माऊली हॉटेल समोर भरधाव वेगात आलेल्या हायवाच्या धडकेत मोटारसायकलस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर हायवा चालक वाहनासह पसार झाला आहे. अविनाश चंद्रकांत दोडमणे (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे. अविनाश मोटारसायकलवरून रस्ता ओलांडत असताना दुर्दैवी अपघात झाला. या धडकेत त्याच्या पोटास व हाताला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला. अधिक तपास वडगाव पोलीस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com