Heavy Rain : पाथर्डीत तालुक्यात अतिवृष्टीचा कहर; करंजी परिसरातील अनेकांचे संसार उघड्यावर, शेतीचेही मोठे नुकसान

Ahilyanagar News : मुसळधार पावसाने राज्याभरात हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात देखील हीच परिस्थिती पाहण्यास मिळत आहे
Heavy Rain
Heavy RainSaam tv
Published On

सुशील थोरात 

पाथर्डी (अहिल्यानगर) : राज्यात जोरदार पावसाचा तडाखा बसत असून अनेक ठिकाणी पावसाने झोडपून काढले असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच अहिल्यानगर जिल्ह्याला देखील जोरदार पावसाचा तडाखा बसला असून जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टीने कहर केला असून यात अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. 

अहिल्यानगर जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. जिल्ह्यात सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पाथर्डी तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण केली आहे. करंजी परिसरात कधी नव्हे असा अविरत पाऊस झाला असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. घरामध्ये शिरलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले असून शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

Heavy Rain
Nandurbar : बनावट कागदपत्रांचा आधारे मंजूर नसलेल्या पदावर नियुक्ती; नंदुरबार शिक्षण विभागाचा बोगस कारभार

पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक नुकसान 

हवामान खात्याच्या ईशाऱ्यानुसार सुरू झालेला पाऊस सोमवारी दुपारपर्यंत सुरूच राहिला. या पावसाने केवळ शेतीच नव्हे; तर जनावरांनाही उध्वस्त केले. अनेक जनावरे पाण्यात वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अनेकांना अश्रू अनावर झाले. जिल्ह्यात एकूण १ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून त्यात तब्बल ५० हजार हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान एकट्या पाथर्डी तालुक्यात झाले आहे. या अनपेक्षित आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असून तातडीने मदत आणि पंचनाम्याची मागणी होत आहे.

Heavy Rain
Ashti Heavy Rain : बीड जिल्ह्यात धुवाधार पाऊस; कडा शहर जलमय, पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे रेस्क्यू

स्मशानभूमी पाण्याखाली, गोदावरी नदीची पाणीपातळी वाढली.
नांदेड : बीड - परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये गोदावरी नदी दुथडी भरून प्रवाहित झाली. नदीवर असलेल्या अनेक मध्यम प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून नांदेडमध्ये गोदावरी नदी धोकादायक पातळीच्या जवळून वाहत आहे. त्यामुळे शहरातील गोवर्धनघाट इथली मुख्य स्मशानभूमी पाण्याखाली बुडाली आहे. अंत्यसंस्कारासाठी पर्यायी जागा म्हणून सिडको भागातील स्मशानभूमीचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com