ATM Crime Saam tv
महाराष्ट्र

ATM Crime: एटीएम फोडून अकरा लाख लांबविले; घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद

Kopargaon News : १९ डिसेंबरला पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम मशीन कटरच्या सहाय्याने तोडून यात असलेली ११ लाख रुपयांची रक्कम लांबवली

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहमदनगर) : पहाटेच्याच सुमारास चोरट्यांनी एटीएमवर डल्ला टाकल्याची घटना समोर आली आहे. (ATM Crime) चोरट्यांनी इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम फोडून यातून तब्बल अकरा लाख रुपये लांबवल्याची घटना कोपरगाव (Kopargaon News) तालुक्यातील पोहेगाव याठिकाणी घडली आहे. (Maharashtra News)

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे इंडियन ओव्हरसीस बँकेचे एटीएम मशीन लावण्यात आले आहे. १९ डिसेंबरला पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम मशीन कटरच्या सहाय्याने तोडून यात असलेली ११ लाख रुपयांची रक्कम लांबवली. दरम्यान संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथेही त्याच रात्री बँकेचे एटीएम फोडून चार लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली आहे. या दोन्ही एटीएम फोडीमागे एकच टोळी असण्याची शक्यता असून (Police) पोलिस पुढील तपास करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध सुरु 

पहाटे घडलेल्याची ही घटना येथे लावण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. हे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून अज्ञात चोरट्यांविरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेटेजद्वारा पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : हितशत्रूंचा धोका अन् अतिधनाचा मोह आवरा; ५ राशींच्या लोकांना घ्यावी लागेल विशेष काळजी

GK: Gen Z आहेत कोण? नेपाळच्या रस्त्यावर तरुणांनी घातला मोठा गोंधळ

Maharashtra Live News Update: हिंजवडीतील खराब रस्त्याविषयी सुप्रिया सुळे यांची परत एकदा एक्स वर पोस्ट करत प्रशासनाची कानउघडणी

Pitru Paksha 2025: पितृपक्षात कपडे विकत घेणे का टाळावे? जाणून घ्या नेमकं कारण

Nepal Protest: नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात आंदोलन पेटलं; १८ मृत्यू, २५० पेक्षा जास्त जखमी|VIDEO

SCROLL FOR NEXT