सांगली : सांगली शहरातील राजवाडा चौक येथे असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या शाखेतील पैसे भरण्याच्या (Sagnli) मशीनमध्ये तिघा संशयितांनी एका बंद खात्यावर ५०० रुपयांच्या १९ बनावट नोटा भरल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी बँकेचे नोडल ऑफिसर खराडे यांनी (ATM Crime) सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बनावट नोटा भरणाऱ्या सतीश सुखदेव पाटील आणि दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News)
सांगली शहरातील राजवाडा चौक येथे आयसीआयसीआय बँकेची मुख्य शाखा आहे. याठिकाणी पैसे भरण्याचे मशीन ठेवण्यात आले आहे. या दरम्यान १४ नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास बँकेचे खातेदार सतीश सुखदेव पाटील हे दोन अज्ञात व्यक्तींसोबत बँकेत आले. त्यांनी त्यांच्या साथीदारांसह संगनमत करून त्यांच्या बँक खात्यावर ५०० रुपयांच्या १९ चलनी बनावट नोटा (Fake Notes) या बनावट असल्याचे माहित असून देखील त्या खऱ्या आहेत असे भासवून वापरात आणण्याच्या उद्देशाने मशीनमध्ये भरल्या.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कॅश काढल्यानंतर आले उघडकीस
मशीनमधून कॅश बाहेर काढत असताना सदरच्या नोटा या बनावट असल्याचे निदर्शनास आले. यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता सदरच्या नोटा या खातेदार सतीश पाटील यांनी भरल्याचे समोर आले. यानंतर बँकेचे नोडल अधिकारी बाळासाहेब खराडे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.