Nashik Water Supply: ऐन हिवाळ्यात नाशिककरांची पाण्यासाठी वणवण; ७ तालुक्यांमध्ये टँकरने होतोय पाणीपुरवठा

Nashik Water Shortage: नाशिकमधील ७ तालुक्यांत तब्बल १२० टँकरने पाणीपुरवठा करण्यात आलाय. येवला तालुक्यामध्ये एकूण ४५ गावं आहेत. तर १५ वाड्या आहेत. येथे डिसेंबर महिन्यात २३ टँकरने
Nashik Water Supply
Nashik Water SupplySaam TV
Published On

अभिजीत सोनवणे

Nashik News:

नाशिककरांसमोर पाणीटंचाईचं मोठं संकट उभं राहिलं आहे. पाणीटंचाईने यंदा पहिल्यांदाच ७ तालुक्यांत डिसेंबरमध्ये ११६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आलाय. नाशकात यंदा मुबलक पाऊस न बरसल्याने नागरिकांना हिवाळ्यामध्येचं पाण्यासाठी टँकर मागवावे लागत आहेत.

नाशिकमधील ७ तालुक्यांत तब्बल १२० टँकरने पाणीपुरवठा करण्यात आलाय. येवला तालुक्यामध्ये एकूण ४५ गावं आहेत. तर १५ वाड्या आहेत. येथे डिसेंबर महिन्यात २३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आलाय. नंदगावमध्ये एकूण ३७ गावं आहेत. तर १६२ वाड्या आहेत. येथे डिसेंबर महिन्यात ३५ टँकरने (Tanker) पाणीपुरवठा करण्यात आलाय. बागलाण तालुक्यात एकूण १७ गावं आहेत. तर ०५ वाड्या आहेत. येथे डिसेंबर महिन्यात १५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आलाय.

चांदवडमध्ये ९ गावांत १९ वाड्या आहेत. या वाड्यांमध्ये १५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आलाय. देवळा येथे ६ गावांत २९ वाड्या आहेत. येथे ८ टँकर मागवण्यात आलेत. मालेगाव तालुक्यात १४ गावं आहेत. त्यात १३ वाड्यांमध्ये १५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आलाय. तर सिन्नर तालुक्यात ३ गावांमध्ये ६ वाड्या आहेत. या सहा वाड्यांना ९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आलाय.

नाशिक शहरामध्ये देखील पुढील महिन्यात पाणीटंचाई भासू शकते. पाणीकपात करण्याबाबत जलसंपदा विभागाने काही दिवसांपूर्वीच नाशिक महापालिकेला एक पत्र लिहिलं आहे. नाशिक (Nashik) महापालिकेने गंगापूर धरणात चर खोदला नाही तर २० टक्के पाणीकपात होणार आहे, असं जलसंपदा विभागाने महापालिकेला दिलेल्या पत्रात म्हटलं आहे. शानिक शहरामध्ये यामुळे तब्बल २० टक्के पाणी कपात केली जाईल असंही या पत्रात म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com