- माेबीन खान
शिर्डी : साईबाबा संस्थांनने (shirdi) व्दारकामाई मंदिराच्या दर्शन वेळेत बदल केला आहे. आजपासुन साईबाबांची (sai baba) रात्रीची शेजारती होईपर्यंत व्दारकामाई मंदिर (dwarkamai mandir) भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार असल्याने भाविकांना उशिरापर्यंत साईधुनी आणि व्दारकामाई मंदिरात (shirdi temple) दर्शन घेता येणार आहे. (shirdi latest marathi news)
शिर्डी येथे देश-विदेशातुन लाखो भाविक साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरीता येत असतात. या ठिकाणी आल्यानंतर भाविक समाधीसह व्दारकामाई, चावडी आणि गुरुस्थान आदी ठिकाणी प्राधान्याने दर्शनाकरीता जातात. त्यातच बाबांनी त्यांच्या हयातीत संपुर्ण जीवन हे व्दारकामाई येथे व्यतीत केले. या ठिकाणाहुन बाबांनी अनेक भाविकांना शिकवण, उपदेश दिला आहे. त्यामुळे व्दारकामाईस अनन्य साधारण असं महत्व आहे.
त्याअनुषंगाने संस्थान व्यवस्थापन समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत साईबाबांची रात्रीची शेजारती होईपर्यंत व्दारकामाई मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी खुले ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुर्वी द्वारकामाई मंदिर ९.३० वाजता बंद केले जात असे. नव्या निर्णयानूसार मंदिर रात्री साडे दहा पर्यंत भाविकांसाठी खूले राहणार आहे. हे मंदिर पहाटे पाच वाजता उघडले आणि रात्री साडे दहा वाजता बंद केले जाईल अशी माहिती शिर्डी संस्थान व्यवस्थापन समितीनं प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.