कल्याण एका मुलाच्या आईस्क्रीममध्ये आढळला किडा
कुटुंबीयांनी दुकानदाराकडे केली तक्रार
नागरिकांकडून कारवाईची मागणी
खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत चिंता वाढली
संघर्ष गांगुर्डे, कल्याण
Kalyan East Kolsewadi Warm Found तुमची मुलं देखील पॅकेट बंद आईस्क्रीम खातात का? मग सावधान! कारण कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने खरेदी केलेल्या आईस्क्रीममध्ये किडा आढळल्याचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे अन्नसुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील रचना पार्क (Kalyan East Rachana Park) परिसरात राहणाऱ्या शशांक जाधव (Shashank Jadhav) या मुलाने जवळील परिसरातील एका दुकानातून कोन आईस्क्रीम खरेदी केले होते. घरी आल्यानंतर त्याने आईस्क्रीम खाण्यास सुरुवात केली. मात्र भाग खाल्ल्यानंतर त्याच्या लक्षात आले की आईस्क्रीममध्ये घोळ आहे. नीट पहिल्यानंतर त्यामध्ये सुमारे तीन इंच लांबीचा किडा असल्याचे आढळले. हा प्रकार लक्षात येताच शशांकच्या कुटुंबीयांनी तातडीने संबंधित दुकान गाठले आणि याबाबत विचारणा केली. त्यांनी दुकानदाराकडे याप्रकाराबाबत स्पष्टीकरण मागितले तसेच या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली. या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दुकानदाराने संबंधित आईस्क्रीम कंपनीच्या वितरकाला घटनास्थळी बोलावले. यावेळी दुकानदाराने आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, संबंधित आईस्क्रीम त्याला कंपनीकडून सीलबंद मिळाले होते. तसेच उत्पादनाची एक्सपायरी डेट 2027 पर्यंत वैध असल्याने साठवणुकीत किंवा विक्री प्रक्रियेत कोणतीही चूक झालेली नाही, असा दावा त्याने केला.
दरम्यान, शशांकच्या कुटुंबीयांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित उत्पादनाचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत, अशी मागणीही स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि ग्राहकांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात असून संबंधित यंत्रणांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.