Rain Update : महाबळेश्वर- पोलादपूर रस्ता बंद, कृष्णेची पातळी वाढली, रत्नागिरी, सिंधुदुर्गात जाेरदार पाऊस

हवामान विभागाने दाेन दिवस पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
Maharashtra Rain News, Mahabaleshwar Rain News, Mahabaleshwar Poladpur Ghat
Maharashtra Rain News, Mahabaleshwar Rain News, Mahabaleshwar Poladpur Ghatsaam tv
Published On

सातारा/रत्नागिरी/सिंधुदूर्ग : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानूसार आजही (गुरुवार) सातारा (satara rain), सांगली (sangli rain), रत्नागिरी (ratnagiri rain) तसेच सिंधुदूर्ग (sindhudurg rain) जिल्ह्यात दमदार पाऊस (rain) पडत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झालेली आहे. काही ठिकाणी छाेटे-माेठे पुल पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान आज (गुरुवार) महाबळेश्वर ते पोलादपूर हा रस्ता अंबेनाळी घाटातील (ambenali ghat) रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. (Maharashtra Rain News)

सातारा जिल्ह्यात मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते, घाट,पुल याचे मोठे नुकसान झाले होते. दरडी कोसळून मोरी आणि पुलांचे मोठे नुकसान झाले होते. या सर्व ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहेत. त्यामुळे प्रतापगड कुंभरोशी तापोळा अहिर रस्ता तसेच पार कमान ते देवळी रस्ता आज (ता. 14 जूलै) सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व वाहतुकीस दुरुस्तीच्या अनुषंगाने बंद ठेवण्यात येणार आहे. सर्व प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Maharashtra Rain News, Mahabaleshwar Rain News, Mahabaleshwar Poladpur Ghat
Palghar Rain : पालघर जिल्ह्यात ग्रामीणसह शहरी भागातील शाळांना सुट्टी जाहीर

रत्नागिरीत लाटांच तांडव

रत्नागिरीच्या समुद्राचं रौद्र रुप पहायला मिळतय. लाटांचं तांडव रत्नागिरीत सुरु आहे.17 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलाय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या पुरजन्य परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालय. एनडीआरएफची टीम खेड आणि चिपळूणमध्ये दाखल झालेली आहे.

कृष्णेच्या पातळीत दीड फुटांनी वाढ

सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ सुरू आहे. गेल्या आठ दिवसांत फुटा फुटाने पाणी पातळीत वाढ होत आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने कोयनेतून एक हजार 50 क्यूसेक पाणी सोडण्यात आल्याने सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत रात्रीत दीड फुटाने वाढ झाली आहे. कृष्णेची पातळी साडे एकोणीस फुटांवर गेली आहे. तर अलमट्टी धरणातून एक लाख 25 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सांगली जिल्ह्याला यंंदा तरी थोडासा दिलासा मिळाला आहे.

.- विनायक वंजारे (साम प्रतिनिधी)

सिंधुदुर्गात मुसळधार

सिंधुदुर्गात जिल्ह्यात रात्री पासूनचं पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सर्वत्र थांबून थांबून मोठ्या सरी कोसळत आहेत. हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच ताशी 40 ते 45 प्रती तास वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

एनडीआरफच्या पथकाचे मार्गदर्शन

हवामान विभागाकडून जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या देण्यात आलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभुमीवर सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यात सध्या एनडीआरएफचे (NDRF) एक पथक तैनात करण्यात आले आहे. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे धरण 84 टक्के भरले आहे. खबरदारी म्हणून या धरणातून पाच हजार 669 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी एनडीआरएफच्या पथकाने खानयाळे- मांगेली भागात पाहणी केली. तसेच येथील ग्रामस्थांना व शाळेतील मूलांना मार्गदर्शन केले. यावेळी आपत्कालीन परिस्थितीत बचाव कसा करावा याची माहिती देखील ग्रामस्थ व विद्यार्थी यांना देण्यात आली. (Mahabaleshwar Poladpur Ghat)

Maharashtra Rain News, Mahabaleshwar Rain News, Mahabaleshwar Poladpur Ghat
Jaykumar Gore : शरण जा ! सर्वाेच्च न्यायालयाचा भाजप आमदार जयकुमार गाेरेंना आदेश
Maharashtra Rain News, Mahabaleshwar Rain News, Mahabaleshwar Poladpur Ghat
Maharashtra Rain Updates : पुणे, पिंपरी चिंचवड, खालापूर, माथेरानच्या शाळांना सुट्टी जाहीर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com