

* फॉरेन्सिक टीमकडून प्राप्त झालेल्या मोबाईलच्या क्लोन डाटाच्या आधारावर करण्यात आली चौकशी
* निदा खान मतीन पटेलच्या संपर्कात असताना मतीन पटेलने काही राजकीय नेत्यांना संपर्क केल्याचे मोबाईलच्या तपासातून समोर
* काही मोठ्या नेत्यांची देखील एसआयटीकडून चौकशी केली जाण्याची शक्यता
* टीसीएस प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान संभाजीनगरला असताना मतीन पटेलने तिला आश्रय दिल्याचा आहे आरोप
* मतीन पटेलला देखील एका गुन्ह्यामध्ये करण्यात आलंय सहआरोपी
NEET आणि CBSE परीक्षा प्रक्रियेमधील कथित गैरव्यवहार, विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या प्रश्नांवर आज काँग्रेसच्या वतीने कोल्हापुरात कॅन्डल मार्च काढण्यात आला... काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या सह काँग्रेसचे अन्य नेते सहभागी झाले होते... हा कॅन्डल मार्च राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळ येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी चौक येथे समाप्त झाला. या वेळी जोरदार घोषणा बाजी करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला...
उद्या मंचर येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रास्तारोको आंदोलनापूर्वी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारवर टीका केली आहे. नाफेड खरेदीचा फायदा व्यापाऱ्यांऐवजी शेतकऱ्यांना मिळावा, भावांतर भुक्तान योजना लागू करावी आणि कांद्यासाठी एमएसपी रेंज निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पुणे जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आंबेगाव व खेड तालुक्यात ५ ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली; यामध्ये १९ लाख ३ हजार ३७९ लाख रुपयाचा साठा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे विभागाचे सहायक आयुक्त (अन्न्) यांनी दिली आहे.
सोलापुरातील एका मदरसात धार्मिक शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मौलाना मोहम्मद उमर रिझवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी संध्याकाळी आरोपीने मुलीला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. पीडितेने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी पॉकसो कायद्यानुसार गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.
अकोला जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून वातावरणात मोठा बदल झाला असून अकोट, अकोला आणि मूर्तिजापूर तालुक्यांत जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सकाळपासूनच थंड वारे वाहत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. दरम्यान, नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील दोन दिवस जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली असून ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
शिरूर तालुक्यातील करडे घाट परिसरात दोन गुन्हेगार गटांतील जुन्या वादातून झालेल्या गोळीबारात सराईत गुन्हेगार विशाल काळे याचा मृत्यू झाला. दोन गट आमनेसामने आल्यानंतर वाद विकोपाला जाऊन गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शिरूर तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारी टोळ्यांच्या वर्चस्वाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
नालासोपाऱ्यातील प्रगती नगर, हंड्रेड फूट रोड परिसरात एका नायजेरियन महिलेवर लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित महिला रस्त्याच्या कडेला असलेल्या सोफ्यावर झोपलेली असताना एक तरुण तिच्याजवळ येऊन दोन ते तीन वेळा दांड्याने मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने शेखर गोरे यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शेखर गोरे यांची नाराजी स्वाभाविक असल्याचे म्हटले. "शेखर गोरे हे माझे बंधू आहेत. उमेदवारी मिळावी, अशी त्यांची अपेक्षा होती. ती पूर्ण न झाल्याने ते नाराज असणे साहजिक आहे. मात्र पक्ष त्यांना भविष्यात योग्य संधी देईल. महायुतीतील सर्व घटक एकत्रितपणे काम करतील," असे जयकुमार गोरे यांनी सांगली येथे बोलताना स्पष्ट केले.
परभणी जिल्ह्यात सोमवारी दुपारनंतर विविध भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला, तर काही भागांत गारपीटही झाली आहे.अचानक झालेल्या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, तर शेतकरी वर्गात पिकांच्या नुकसानीची चिंता व्यक्त होत आहे.गंगाखेड तालुक्यातील तांदुळवाडी गावात गारपीठ ही झाली आहे..
नाशिकच्या येवला तालूक्यातील अंदरसुल येथील अमोल रवींद्र सैंन्दर हे आपल्या मोटरसायकल वरून घरी जात असताना अंदरसुल-सायगाव रोड लगत त्यांच्या पल्सर मोटरसायकलला अचानक आग लागल्याने त्यात ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अंदरसुल येथील भागवत हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती समजतात परिसरातील रहिवासी घटनास्थळ धाव घेत मोटार सायकल विझवण्याचा प्रयत्न केला,शेतातील तळ्यातून पाईप टाकुन मोरसायकल विझवन्यात यश आले मात्र यात मोटरसायकल जळून खाक झाली,गाडीतील वायरींगला शॉर्ट सर्किंटमुळे आग लागल्याच बोलल जातय.
नीट पेपर फुटी प्रकरणी चौकशीच्या अनुषंगाने मागच्या वीस दिवसापासून सीबीआयचं एक पथक लातूरमध्ये तळ ठोकून आहे, आज पुन्हा लातूरच्या आरसीसी क्लास वर सीबीआयचे एक पथक पोहोचल आहे. शिवराज मोटेगावकर याच्या कार्यालयात पुन्हा सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे, तब्बल सहा दिवसाच्या गॅपनंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा चौकशी सुरू केली आहे.
बहुचर्चित जमीन खरेदी फसवणूक प्रकरणात तपासासाठी घेतला ताबा
सिन्नर न्यायालयाने अशोक खरातला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली
ईडी चौकशीनंतर खरातची रवानगी पुन्हा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात झाली होती
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर संजय काकडे यांनी सुनेत्रा पवार यांचे आणि पक्षाचे आभार मानले. त्यावेळी सुनील टिंगरे यांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी केली.
वादळी वाऱ्यामुळे भिंत अंगावर पडून करमाळा तालुक्यातील पोमलवाडी येथे वृध्द दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जगन्नाथ व शालन नवले असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. भिंतीच्या आडोशाला जेवण करत असताना अचानक वारे आले. त्यामुळे सिमेंट विटांची भिंत अंगावर पडून त्यांचा मृत्यू झाला. मयताच्या नातूने फोन केला परंतु प्रतिसाद मिळाला नाही. तो स्वतः घरी आल्यानंतर आज ही घटना समोर आली.
शिर्डीत उद्या शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय मेळावा होणार आहे. मेळाव्यासाठी खासदार संजय राऊत, अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, सुनील शिंदे करणार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार
नंदकिशोर महाजन हे मोठ्या बहुमताने आणि मोठ्या मतांनी जिंकतील असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय.
नीट पेपरफुटी प्रकरणात अपडेट
मनिषा हवालदार ची जेल मध्ये रवानगी
आरोपी तेजस शाह आणि आरोपी डॉ मनोज शिरुरे यांना सुद्धा न्यायालयात केलं हजर
तिन्ही आरोपींना 14 दिवसांसाठी म्हणजे 15 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी
महायुतीकडून सईद खान यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे महायुतीकडे परभणी हिंगोली विधान परिषदेमध्ये मतांची संख्या जास्त आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल असा मला विश्वास आहे माहितीतील काही आमदार सोबत आली नसतील तर त्यांचे आमच्या सोबत बोलणे झालेले आहे
वाशिम शहरालगतच्या काटा रोडवरील एका वाईन बारसमोर मध्यरात्री दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. सुरुवातीला दोन तरुणांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर काही वेळातच मोठ्या राड्यात झाले. यावेळी दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांवर काठ्या, फळ्या आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला चढविल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सुनिल टिंगरे डमी उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे राष्ट्रवादीत उमेदवारावरून गोंधळ निर्माण झाला आहे.
चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी आज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. काँग्रेसकडून शैलेश अग्रवाल यांनी, तर भाजपकडून अरुण लाखानी यांनी उमेदवारी अर्ज सादर केला.
अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने सुद्धा एन्ट्री केली आहे. वंचित बहुजन आघाडी कडून वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आणि नगरसेवक निलेश विश्वकर्मा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा गॅस एजन्सी बाहेर नागरिकांनी सिलेंडर साठी रांगा लागल्या आहेत, ऑनलाइन बुकिंग करूनही सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांनी सकाळपासून एजन्सी बाहेर रांगा लावले आहेत, अशातच व्यावसायिक आणि घरगुती गॅसचे दर वाढल्याने नागरिकांना आर्थिक फटका देखील बसलाय.
कोकण किनारपट्टीवर आज १ जून पासून सागरी मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे. मस्य विभागाने ही बंदी जारी केली आहे. त्यामुळे १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्याच्या कालावधीत सागरी मासेमारी पूर्णपणे बंद असणार आहे. या काळात मासे प्रजनन आणि बीज सवर्धन करतात. त्यामुळे या कालावधीत संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सागरी मासेमारी बंद राहणार आहे.
यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट
मंत्री संजय राठोड यांच्या अर्धांगिनी शितल राठोड यांना उमेदवारी फायनल झाल्याची माहिती
यवतमाळ एमएलसीसाठी मंत्री संजय राठोड यांच्या पत्नीला शिंदेसेनेकडून उमेदवारी फायनल झाल्याची सूत्राची माहिती
आधी दुष्यंत चतुर्वेद च नाव चर्चेत असताना अचानक शितल राठोड यांना उमेदवारी फायनल झाल्याची चर्चा
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर,मुदखेड तालुक्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपले.
काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळी बागांचे प्रचंड नुकसान.
अर्धापूर मुदखेड तालुक्यातील केळी बागा झाल्या आडव्या.
बारड,पांढरवाडी, निवघा, ईजळी, शेंबोली या गावातील शेकडो हेक्टर वरील केळी बागा उध्वस्त.
तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी.
दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात उघडकीस आलेल्या गर्भलिंग निदान प्रकरणात किकवी (ता. भोर) येथील डॉ. मंदार माळी यांचे नाव समोर आले असून, यवत पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी अण्णासाहेब गिरी आणि त्याचा डॉक्टर साथीदार अतुल जाधव यांना न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
संजय काकडे सुनेत्रा पवार यांच्या भेटीला
संजय काकडे यांचे सुपुत्र विक्रम काकडे यांना उमेदवारी अर्ज मिळणार
जिजाई निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते उपस्थित
शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या बनावट प्रती बाजारात
दादोजी कोंडदेव गुरु असल्याचा या पुस्तकात उल्लेख
शिवाजी महाराज यांची बदनामी करणारे अनेक उल्लेख पुस्तकात
शिवाजी कोण होता हे पुस्तक कॉपीराईट असताना त्यात बदल करून बाजारात
पुण्यातल्या मधुश्री पब्लिकेशन कडून पुस्तक बाजारात
पानसरे कुटुंबाचा या पुस्तकावर तीव्र आक्षेप
जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील ज्येष्ठ वाहन चालक अरविंद राजाराम पाटील हे ३० मे रोजी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.
त्यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी विद्यमान कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी यांनी स्वतः वाहन चालवत त्यांना त्यांच्या घरी सोडून त्यांच्या प्रामाणिक व समर्पित सेवेचा गौरव केला.
कुलगुरूंच्या या अनोख्या कृतीमुळे कर्मचाऱ्यांप्रती आदराचा एक सकारात्मक संदेश दिला गेला.
उन्हाळ्याच्या झळा केवळ माणसांनाच नाही तर पाळीव प्राण्यांनाही बसत आहे.
पाणी पिण्यासाठी कुत्र्याने प्लॅस्टिक बाटलीत तोंडघातले, मात्र काही केल्या बाटलीतून तोंड निघेना
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अल्पसंख्यांक समाजातील युवा चेहरा सईद खान यांना उमेदवारी देत राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू केली आहे.
पुण्यातील जिजाई या निवासस्थानी सुनेत्रा पवारांच्या उपस्थित बैठक सुरू
सुनेत्रा पवार यांच्यासोबत आमदार सुनील शेळके आणि माजी आमदार विलास लांडे उपस्थित
आज दुपारी तीन वाजेपर्यंत विधान परिषदेच्या उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम वेळ
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज भाजप आणि काँग्रेस उमेदवार नामांकन सादर करणार आहेत. भाजपकडून अरुण लाखानी, तर काँग्रेसकडून शैलेश अग्रवाल हे उमेदवार आहेत. चंद्रपूर गडचिरोली वर्धा या तीन जिल्ह्यांचा मिळून हा मतदार संघ असून एकूण 977 मतदार यात आहेत. आज दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार नामांकन दाखल करीत असल्याने पक्षातील मोठ्या नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, तर भाजपचे सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार कीर्ती भांगडिया यांची उपस्थिती असेल.
जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 20 वर्षांच्या पक्षनिष्ठेची पावती म्हणून पक्षाने ही उमेदवारी दिल्याची भावना नंदकिशोर महाजन यांनी व्यक्त केली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे जिल्ह्यातील नेते आमदार खासदारांचे आभार मानले. दरम्यान गुलाबराव पाटील हे प्रताप पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते हे योग्यच होतं मात्र मला उमेदवारी देणे हा पक्षाचा निर्णय असल्याचे मतही नंदकिशोर महाजन यांनी बोलताना व्यक्त केले आहे..
नांदेड विधान परिषदेची जागा भाजपाला सुटली. भाजपाने खासदार अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक अमर राजूरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महायुती कडून आज सोमवारी अमर राजूरकर हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. खासदार अशोक चव्हाण आणि भाजपा नेत्याच्या उपस्थितीत अमर राजूरकर उमेदवारी दाखल करणार आहेत .
दहावीच्या परीक्षेची एकत्रित गुणपत्रक आणि प्रमाणपत्र आज दुपारी तीन वाजल्यानंतर शाळांमार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणार
माध्यमिक शाळांना विभागीय मंडळामार्फत सकाळी अकरा वाजता प्रमाणपत्र दिली जाणार आहेत
गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने हैराण झालेल्या खटाव तालुक्यातील डिस्कळ सह ललगुण, बुध परिसरात नागरिकांना अखेर निसर्गाने मोठा दिलासा दिला आहे. आज दुपारनंतर अचानक हवामानात बदल झाल्यामुळे वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. या दमदार पावसामुळे अक्षरशः रस्त्यावर पाण्याचे लोट पाहायला मिळाले.. तासभर पडलेल्या पावसामुळे भूजल पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. शेतीसाठी हा पाऊस समाधानकारक असल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीसाठी उपयुक्त असणार आहे.
यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले आहे आत्तापर्यंत केवळ एकच अर्ज दाखल झाला असला तरी राजकीय पक्षांचे उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन आज होण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राजकीय जत्रेचे चित्र पाहायला मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.