Sakshi Sunil Jadhav
गुरु चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ आणि यशाचा मार्ग दाखवणारे थोर गुरु मानले जातात.
चाणक्य नितीमध्ये तुम्हाला पैसा कसा साठवायचा आणि कोणत्या जागी पैसे खर्चायला टाळाटाळ केली पाहिजे याबद्दल जाणून घेणार आहोत.
चाणक्यांच्या मते सर्वात मोठी चूक म्हणजे, काही व्यक्ती स्वत:ची छाप पाडण्यासाठी खूप पैसे खर्च करतात.
चाणक्यांच्या मते, तुम्ही जेव्हा दिखाव्यासाठी पैसे खर्च करता, तेव्हा तुम्हाला समोरची व्यक्ती कंट्रोल करू शकते. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वागत नाहीत.
चाणक्य म्हणतात, ज्या लोकांना दिखावा करायला आवडतो, त्यांच्या कामापुरती वापर लोक करतात.
तुम्ही इतरांवर खर्च करता, तेवढ्या पुरतीच लोक तुमच्याशी नीट वागतात. नंतर ते इतरांसोबत तुमच्या वाईट चर्चा करतात.
तुम्ही ज्या व्यक्तींवर पैसे उधळताय, ते लोक तुम्हाला तुमच्या वाईट वेळात मदत करतातयेत का? हे तपासा.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे, बरेच लोक समाजासाठी बिनधास्त खर्च करतात. पण ऐनवेळी समाज मदतीला येत नाही.