Rain Update : भंडा-यासह गाेंदियात पावसाचं थैमान; चाैघांचा मृत्यू

पावसामुळे तुमसर, पवनी तालुक्यातील काही भागातील बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
Bhandardara Rain News, Gondia Rain News, Gondia Weather Forecast, Bhandardara Rain Today
Bhandardara Rain News, Gondia Rain News, Gondia Weather Forecast, Bhandardara Rain Todaysaam tv
Published On

भंडारा / गाेंदिया : भंडा-यासह (bhandara) गाेंदिया (gondia) जिल्ह्यात आजही पावसानं (rain) हजेरी लावलेली आहे. यामुळे दाेन्ही जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील 25 मंडळांमध्ये अतीवृष्टीची नाेंद झालेली आहे. तुमसर आणि पवनी तालुक्यात एसटी बस सेवा (msrtc bus) काही भागात पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. (Bhandardara Rain News)

भंडारा जिल्ह्यात वीज पडून एकाचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी ग्रामीण भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. सखल भागामध्ये पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील 25 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. पवनी, मोहाडी आणि तुमसर या तीन तालुक्यात जलमय वातावरण पहायला मिळत असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान तुमसर आणि पवनी तालुक्यात एसटी बस सेवा काही भागात पूर्णपणे बंद केली आहे. प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान भंडारा जिल्ह्यात वीज पडून एकाचा मृत्यू झाला आहे.

Bhandardara Rain News, Gondia Rain News, Gondia Weather Forecast, Bhandardara Rain Today
Barshi Rain : उस्मानाबाद- परांडा बस रेल्वे पुलाखाली अडकली, ५ ते ६ फुटांपर्यंत होते पाणी, सुदैवानं...

धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु

या भागात पूरपरिस्थिती उदभवू नये यासाठी जिल्ह्यातील धरणांचे दार खुली करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प समजल्या जाणाऱ्या गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आले. अकरा दरवाजे दाेन मीटरने तर 22 दरवाजे दीड मीटरने उघडले. त्यातून 11226.99 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Bhandardara Rain Today)

भाविक सुखरुप

दरम्यान गुरुपौर्णिमा निमित भंडारा जिल्ह्यातील माडगी येथील वैनगंगा नदीच्या पात्रात असलेले नरसिह मंदिरात अड़कुन पडलेल्या 15 भाविकाना अखेर 19 तासांचा अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले. यात सा महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे.

गोंदिया : तीन युवकांचे मृतदेह मिळाले

गोंदिया (Gondia) येथे गेले चार दिवसांपासून पाऊस (Gondia Rain Update) सतत सुरू असल्याने नदी, नाले तुडूंब होऊन वाहत आहेत. गोंदिया येथील तुमखेडा खुर्द येथील आशिष बागळे , संजू बागळे व गोंदिया शहरातील गौतम नगरातील जावेद अली हजरत अली सय्यद, रेहान कलीम शेख हे चार युवक नाल्यात वाहुन गेले. त्यापैकी जावेद अली हजरत अली सय्यद, रेहान कलीम शेख, आशिष बागळे यांचे मृतदेह सापडले आहे. बचाव पथक संजू बागळे याचा शोध घेत आहे. (Gondia Weather Forecast)

Bhandardara Rain News, Gondia Rain News, Gondia Weather Forecast, Bhandardara Rain Today
Palghar Rain : तळई, दांडेकर, लिंगा पाडा गावांत पाणी शिरलं; धामणीतून विसर्ग सुरू

भंडारा- मध्यप्रदेश राज्य मार्गावरील वाहतूक सुरु

अखेर 18 तासानंतर नंतर भंडारा- मध्यप्रदेश राज्य मार्गावरील (bhandara madhya pradesh highway) वाहतूक सुरु करण्यात आली आहे. बुधवारी या मार्गावर असलेल्या मोहाडी जवळ नाला पाण्याने भरला हाेता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तात्पुरता हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. बुधवारी येथे तब्बल चार फुटावर पुलावरुन पाणी वाहत असल्याने कोणतीही दुर्घना होऊ नये म्हणून प्रशासनाला नाईलाजास्तव हा निंर्णय घ्यावा लागला होता. आज पहाटे पाचनंतर येथील वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Bhandardara Rain News, Gondia Rain News, Gondia Weather Forecast, Bhandardara Rain Today
Rain Update : महाबळेश्वर- पोलादपूर रस्ता बंद, कृष्णेची पातळी वाढली, रत्नागिरी, सिंधुदुर्गात जाेरदार पाऊस
Bhandardara Rain News, Gondia Rain News, Gondia Weather Forecast, Bhandardara Rain Today
Wimbledon 2022 : कुस्तीच्या पंढरीतील ऐश्वर्या जाधवची विम्बल्डन स्पर्धेसाठी निवड (व्हिडिओ पाहा)
Bhandardara Rain News, Gondia Rain News, Gondia Weather Forecast, Bhandardara Rain Today
शेतक-यांनाे! नऊ पिकांचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश; जुलै अखेर करा अर्ज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com