सोलापूर : बार्शी शहर (barshi) आणि तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस (rain) सुरू आहे. बार्शी शहरानजीक असलेल्या तुळजापूर (tuljapur) रोडवरील ओढ्यातील पाणी रेल्वे पुलाखाली आले होते. त्यात उस्मानाबादहून बार्शीकडे येणारी बस त्या पाण्यात अचानक बंद पडून प्रवासी अडकल्याची घटना घडली. त्यामुळे प्रवासी घाबरून गेले होते. दरम्यान बसमधील सर्व २५ प्रवाशांना सुखरूप असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या अधिका-यांनी दिली. (Barshi Rain News)
या घटनेबाबतची अधिक माहिती अशी : उस्मानाबाद आगाराची बस बार्शीकडे २५ प्रवासी घेऊन निघाली होती. त्यावेळी बार्शीजवळील रेल्वे पुलाखाली असलेल्या एका ओढ्याच्या पुलावरून पावसाचे पाणी वाहत होते. रेल्वे पुलाखाली ५ ते ६ फूट पाणी येऊन वाहू लागले. त्यामुळे कडेला असलेले गार्ड स्टोन दिसत नव्हते.
या बसच्या चालकास पाण्याच्या उंचीचा अंदाज न आल्याने त्यांनी रेल्वे पुलाखालील पाण्यात घातली आणि पुलाखालील पाण्यात येताच ती अचानक बंद पडली. त्यात २५ प्रवासी बसमध्ये अडकले हाेते. याबाबतची माहिती बार्शी बस आगाराचे व्यवस्थापक मोहन वाकळे यांना समजताच त्यांनी त्याची दखल तातडीने घेतली. (Solapur Rain News Today)
वाकळे यांनी बार्शी बस आगारातील महामंडळाची मालवाहतूक करणारा ट्रक घेऊन अडकलेल्या २५ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्या ट्रकमधून बार्शीने बस आगारात सुखरूप आणले. दरम्यान पाण्यात अडकलेली बस दुसऱ्या वाहनाने ओढून बाहेर काढण्यात आली आहे. (Barshi Rain News Update)
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.