Shirdi Airport News  Saam tv
महाराष्ट्र

Shirdi Airport : थरारक! विमानतळावर बिबट्यांचा वावर; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, धडकी भरवणारा VIDEO समोर

Shirdi Airport Latest News : शिर्डी विमानतळावर बिबट्यांचा वावर पाहायला मिळत आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचदरम्यान धडकी भरवणारा व्हिडिओ समोर आला आहे.

Vishal Gangurde

सचिन बनसोडे, साम टीव्ही

शिर्डी विमानतळावर गेल्या काही महिन्यांपासून बिबट्या मादीने पिल्लांसह डेरा टाकल्याचे व्हिडिओ साम टीव्हीने समोर आणले आहेत. वन अधिकाऱ्यांनी या व्हायरल व्हिडिओ बाबत पुष्टी करत उपाययोजना सुरू केल्याचं सांगितलं आहे. मात्र रनवे परिसरात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे कर्मचाऱ्यांच्या आणि प्रवाशांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

साईबाबांच्या दर्शनासाठी विमानाने देशविदेशातून दररोज शेडको भाविक शिर्डीत येत असतात. मात्र विमानतळावर मोकाट जनावरे आणि बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळत असल्याने विमानतळाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून बिबट्या मादी आपल्या पिलांसह विमानतळावर फिरत असतानाचे व्हिडिओ साम टीव्हीने समोर आणलेत. वन अधिकाऱ्यांनी या व्हिडिओची पुष्टी करत परीसरात जवळपास पाच पिंजरे लावलेले आहेत. तसेच इतर ठिकाणच्या पथकाचीही मदत घेतली जातेय. विमानतळ प्रशासनाला वन विभागाने संरक्षक भिंतीची उंची वाढवण्यास सांगितले आहे.

वनविभागाने आठ महिन्यापूर्वी एका नर बिबट्याला विमानतळावरून जेरबंद केलं आहे. मात्र मादी बिबट्या जेरबंद होऊ शकली नाही. आता या मादीला तीन चार पिल्लेही झालेली आहेत त्यामुळे पिल्लांना पडण्यापूर्वी मादी बिबट्याला पकडावे लागणार असल्याचं वनविभागाचे अधिकारी सांगत आहेत.

बिबट्या जर विमान लँडिंगच्या किंवा टेकऑफच्या वेळी रनवेवर आला तर मोठा अपघात होवू शकतो.. मात्र बिबट्या आवाजाला घाबरणारा प्राणी असून विमानाच्या आवाजाने तो रनवेवर येण्याची शक्यता कमी असल्याचं वनअधिकारी म्हणत आहेत.

काहीही असलं तरीही एकाद्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर बिबट्याच्या मुक्त संचारामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.. त्यामुळे लवकरात लवकर या बिबट्यांचा बंदोबस्त करून सुरक्षेच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT