Electricity Outage : वीजबिल थकलं काही घरांचं, पण वीजपुरवठा बंद केला अख्ख्या गावाचा; महावितरणचा अजब कारभार

Electricity Outage In nanded village : गावातील काही लोकांचं वीजबिल थकल्याने महाविररणने संपूर्ण गावावर कारवाई केली आहे. महावितरणच्या अजब कारभाराची सर्वत्र चर्चा होत आहे.
Electricity Outage news
Electricity OutageSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

गेल्या काही वर्षांपासून वीजबिल थकवणाऱ्यांविरोधात महावितरणने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वीजबिल न भरणाऱ्यांचा विरोधात वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई महावितरणकडून केली जाते. नांदेडच्या एका गावातही काही लोकांचे वीजबिल थकलं होते. त्यानंतर महावितरणने अख्ख्या गावाचा वीजपुरवठा बंद केला. महावितरण कंपनीच्या अजब कारभाराचा फटका संपूर्ण गावाला बसला आहे. महावितरणच्या कारवाईची सर्वत्र चर्चा होत आहे.

नांदेडमध्ये महावितरणचा अजब कारभार पहायला मिळतोय. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील धनज या गावाचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने एका महिन्यापासून बंद केला. गावातील काही वीज ग्राहकांनी वीजबिल भरले नाही. परंतु याची शिक्षा मात्र महावितरण कंपनीने अख्ख्या गावाला दिली. गावात लाईट नसल्याने गावकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जाव लागतंय. विशेषतः पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती होत असून विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

Electricity Outage news
Horoscope Today : सोमवार ठरणार आर्थिक अडचणीचा, तर काहींना पाठीवर मिळेल शाबासकीची थाप; वाचा आजचं राशीभविष्य

महावितरण कंपनीच्या या अजब कारभाराचा फटका अख्ख्या गावाला बसत असल्याने महावितरण कंपनीच्या विरोधात गावकरी रोष व्यक्त करत आहेत. सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान गावातील प्रामाणिकपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केलीय.

Electricity Outage news
Walmik Karad News : बीड पोलिस दलात कराडच्या मर्जीतील २६ अधिकारी; तृप्ती देसाईंनी अधीक्षक कार्यालयात पुरावेच सादर केले

शेतकऱ्यांचं महावितरण कार्यालयात आंदोलन

जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील वडीगोद्री आणि परिसरातील गावांमध्ये मागील पंधरा दिवसांपासून वीज नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. डाव्या कालव्याला पाणी असतानाही वीज नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे ऊस,टरबूज आणि फळबागा पाणी न दिल्यामुळे सुकू लागल्या आहेत.

महावितरणने लवकरात लवकर वीज सोडावी, या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी वडीगोद्री येथील महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केलय. दरम्यान महावितरणने लवकरात लवकर वीज न सोडल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Electricity Outage news
Hafiz Saeed Dead : भारताच्या मोठ्या शत्रूचा खात्मा? अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादीवर ठेवलं होतं 1 कोटी डॉलरचं बक्षीस,VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com