Anil Deshmukh 
महाराष्ट्र

Anil Deshmukh: भाजपमध्ये अंतर्गत वाद; गडकरी आणि फडणवीस यांचे वेगवेगळे गट: अनिल देशमुखांचा दावा

Anil Deshmukh: संजय राऊत यांच्या आरोपांना शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी दुजोरा दिलाय. नागपूरमध्ये नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांची दोन वेगळी गट असल्याचं देशमुख म्हणालेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

नागपूर: भाजपमध्ये अंतर्गत वाद आहे, त्यात गडकरी देवेंद्र फडणवीस यांचे गट वेगवेगळे आहेत. त्यामुळे नितीन गडकरी पडतील यासाठी काम केलं गेलं. हे काम कोणी केलं हे सर्वांना माहितीये, असं म्हणत अनिल देशमुख यांनी संजय राऊतांच्या दाव्याला दुजोरा दिलाय. संजय राऊत, आंबादास दानवे यांच्या आरोपानंतर अनिल देशमुखांनी केलेल्या विधानामुळे भाजपमध्ये अंतर्गत वाद असल्याच्या या दाव्याला वाव मिळत आहे.

महाविकासाकडे मध्ये सर्व एकत्र येऊन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवत होते. सर्वांनी एकत्र येऊन काम केलं. मात्र भाजपचा अंतर्गत वाद आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांनी कोणासाठी काम केलं हे सगळ्यांना माहिती आहे तो चर्चेचा विषय असल्याचा गौप्यस्फोट केल्याने भाजपमध्ये खळबळ माजलीय.

भाजपमधील वाद असल्याचा दावा करताना अनिल देशमुख म्हणाले की, संपूर्ण नागपूरला माहिती आहे की, गडकरींना पराभूत करण्यासाठी त्यांच्याच पक्षातील लोकांनी काम केलं. नागपुरात याचीच चर्चा आहे. प्रसारमाध्यमांनी हवं तर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना जाऊन विचारावं की त्यांनी निवडणुकीत नेमकं कोणतं काम केलं?

शिवसेनेचं मुखपत्र सामनामधील रोखटोक या लेखात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नागपूरमधील नितीन गडकरी यांच्या निवडणुकींसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला. गडकरी यांचा पराभव करण्यासाठी मोदी-शाह-फडणवीसांनी एकत्रितपणे प्रयत्न केलेत. गडकरींचा पराभव होत नाही हे लक्षात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस नाईलाजाने नागपुरात गडकरींच्या प्रचारात उतरले.

नितीन गडकरी यांचा पराभव करण्यासाठी फडणवीस यांनी सर्व प्रकारची रसद पुरवल्याची चर्चा संघ परिवारही करत असल्याचं म्हटलं जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक याबाबत उघडपणे बोलताहेत.” दरम्यान राऊतांच्या दाव्यावर बोलतांना अनिल देशमुख म्हणाले, “राऊत जे म्हणतायत ती गोष्ट १०० टक्के खरी आहे.

आंबादास दानवे काय म्हणाले

नितीन गडकरी यांचं नेतृत्व हे महाराष्ट्राला मान्य आहे, त्यामुळेच त्यांचे नेतृत्त्व नागपुरात संपवलं जात असल्याचा आरोप दानवेंनी केलाय. राऊतांच्या आरोपांची रीघ ओढत आंबादास दानवेंनी मोठा दावा केला. गडकरी यांचे नेतृत्व देशाला मान्य आहे, त्यामुळे त्यांचे नेतृत्व संपवलं जात असल्याचं दानवे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Strong Bones : हाडांना कमजोर करतात हे 7 अन्नपदार्थ; तज्ज्ञांनी दिला इशारा

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

SCROLL FOR NEXT