आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्टोरल बाँड्सबाबत विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. टीव्हीच्या जगात ज्यांचा टीआरपी जास्त असतो, त्यांना टीव्हीवर चांगल्या दरात जाहिरातीही मिळतात. तसेच आज आपण सत्ताधारी आहोत, त्यामुळे जास्त देणग्या मिळाल्या, असं ते म्हणाले आहेत.
गडकरी म्हणाले की, ''आगामी निवडणुकीत दक्षिण भारतातून पक्षाचे लक्ष्य गाठले (400 पारचे) जाईल. तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात आम्ही मेहनत घेतली, त्याचे परिणाम निवडणुकीत दिसून येतील.'' (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी म्हणाले की, ''भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए यावेळी ४०० जागांचा टप्पा ओलांडेल याबद्दल त्यांच्या मनात शंका नाही. गेल्या १० वर्षात सरकारने केलेल्या कामांमुळे मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत.'' (Latest Marathi News)
नितीन गडकरी म्हणाले, ''टेलेव्हीजन माध्यमातही ज्याचा टीआरपी जास्त आहे, त्याला चांगल्या आणि उच्च दराने जाहिराती मिळतात. तसेच कमी टीआरपी असलेल्यांना कमी दरात जाहिराती मिळतात. आज आम्ही सत्ताधारी आहोत, त्यामुळे आम्हाला जास्त देणग्या मिळाल्या. उद्या दुसरा कुठला पक्ष सत्तेवर आला तर त्याला जास्त देणग्या मिळतील.''
नितीन गडकरी म्हणतात की, आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण भारतातील पक्षाच्या विद्यमान 288 जागांमध्ये अतिरिक्त जागा जोडल्या जातील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 370 चे लक्ष्य गाठले जाईल.
ते म्हणाले की, आम्ही तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात खूप मेहनत घेतली आहे. कार्यकर्त्यांची ताकद हीच आपली खरी ताकद आहे. गडकरी म्हणाले की, गेल्या काही वर्षांत भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे मजबूत झाला असून विरोधकांनाही जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.