Maharashtra Politics: ४ जूनला आघाडी साफ होईल; वर्षावर वारे वाहतील.. संजय शिरसाटांचा राऊतांवर प्रतिहल्ला

Maharashtra Politics News: संजय राऊत यांना आता काही कामे राहिली नाहीत. त्यांना आता काही स्फोटक वक्तव्य करायची आहेत. म्हणून ते करतात, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला.
Sanjay Shirsat
Sanjay Shirsat vs Sanjay Raut Saam Tv
Published On

सुरज मासुरकर, मुंबई| ता. २६ मे २०२४

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचा एकही उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची यंत्रणा काम करत होती', असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांच्या या दाव्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी जोरदार पलटवार केला आहे. तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात असंतोष आहे, असा मोठा दावाही शिरसाट यांनी केला.

काय म्हणाले संजय शिरसाट?

"संजय राऊत यांना आता काही कामे राहिली नाहीत. त्यांना आता काही स्फोटक वक्तव्य करायची आहेत. म्हणून ते करतात. अजित पवारांचे उमेदवार का पाडायचे काय कारण आहे? त्यांचे पाच उमेदवार होते, शिरूरची जागेवरती उमेदवार आमच्या कडचा दिला आहे. सगळ्यात जास्त सभा मुख्यमंत्र्यांनी या पाचही मतदार संघात केल्या आहेत," असा पलटवार संजय शिरसाट यांनी केला.

तसेच "राष्ट्रवादी शरद पवार गटात असंतोष माजला आहे. सुप्रिया सुळे व रोहित पवार यांची हुकमाशी सुरु आहे. ज्याने शरद पवारांसोबत काम केली आहेत. ते आता रोहित पवारांचा ऐकतील का? तिकडे गोंधळाची स्थिती आहे रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंना सर्व वैतागले आहेत. प्रदेशाध्यक्ष एक पाऊल टाकून आहेत. ते कधी येतील सांगता येत नाही," असा खळबळजनक दावाही शिरसाट यांनी केला.

Sanjay Shirsat
Vijay Wadettiwar: 'भ्रष्टाचारी सरकार, मंत्र्यांनी पापाचा कळस गाठला', डॉ. भगवान पवार यांच्या पत्रानंतर विजय वडेट्टीवारांचा घणाघात!

दरम्यान, ४ तारखेला आघाडी साफ झालेली दिसेल. ४ जून नंतर वर्षावर वारे वाहतील. तसेच आनंदराव अडसूळ आणि कीर्तीकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. पण त्यांनी अशी वक्तव्य करणे योग्य नाही. चार जूननंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याबाबत भूमिका घेतील, असेही संजय शिरसाट यावेळी म्हणाले.

Sanjay Shirsat
Maharashtra Politics: नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा, देवेंद्र फडणवीसांचे प्रयत्न; 'सामना'मधून खळबळजनक दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com