Maharashtra Politics: नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा, देवेंद्र फडणवीसांचे प्रयत्न; 'सामना'मधून खळबळजनक दावा

Saamana Rokhthok On Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला. अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले, असाही दावा संजय राऊत यांनी केला आहे.
नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा, देवेंद्र फडणवीसांचे प्रयत्न; 'सामना'मधून खळबळजनक दावा
Nitin Gadkari/Narendra ModiSaam TV

मुंबई, ता. २६ मे २०२४

'नरेंद्र मोदी व अमित शहा यांची राजवट ४ जूननंतर संपत आहे. या दोघांना दुर करण्यासाठीच देशातील जनतेने मतदान केले, इंडिया आघाडीला बहुमत मिळेल असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार सामनाचे संपादक संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच सामनामधील रोखठोक मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत राजकारणाबाबत सर्वात खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

काय आहे संजय राऊतांचा दावा?

4 जूननंतर भारतीय जनता पक्षामध्ये नरेंद्र मोदी- अमित शहांना पाठिंबा राहणार नाही. नागपुरमध्ये नितीन गडकरी यांचा पराभव व्हावा यासाठी नरेंद्र मोदी अमित शहा तसेच देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केले. असा सर्वात मोठा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. तसेच गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले, असेही संजय राऊत म्हणालेत.

योगी आदित्यनाथांना घरी पाठवले जाईल..

त्याचबरोबर योगी आदित्यनाथ यांच्याबद्दलही मोठा दावा करण्यात आला आहे. जे गडकरींचे तेच योगींचे. मित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे 'योगी को बचाना है, तो मोदी को जाना है' हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला. त्याचा परिणाम ४ जूनला दिसेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा, देवेंद्र फडणवीसांचे प्रयत्न; 'सामना'मधून खळबळजनक दावा
Sangli DCC Bank Scam: सांगली जिल्हा बँकेत मोठा घोटाळा; सहा शाखांमध्ये २. ४३ कोटींचा अपहार; ८ जण निलंबित

दरम्यान, महाराष्ट्राने मोदी-शहांच्या झुंडशाहीशी झुंज दिली. त्यामुळे उद्याच्या दिल्लीतील परिवर्तनात महाराष्ट्राचे नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावेल. एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला. अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले, असाही दावा संजय राऊत यांनी केला आहे.

नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा, देवेंद्र फडणवीसांचे प्रयत्न; 'सामना'मधून खळबळजनक दावा
Ahmednagar Crime: 'माझ्या नवऱ्याला मेसेज का करतेस?', डॉक्टर महिलेकडून नर्सला बेदम मारहाण, जीवे मारण्याची धमकी; नगरमधील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com