Shreya Maskar
जिंजी किल्ल्याला सेंजी किल्ला असेही म्हणतात. तसेच किल्ल्याला 'पूर्वेकडील ट्रॉय' (Troy of the East) आणि 'दक्षिण भारताची भिंत' (Great Wall of South India) म्हणून संबोधले जाते.
जिंजी किल्ला भारताच्या तामिळनाडू राज्यातील विल्लुपुरम जिल्ह्यामध्ये वसलेला आहे. हा विशाल आणि ऐतिहासिक गिरीदुर्ग आहे. जिंजी किल्ला हा अभेद्य किल्ला आहे.
जिंजी किल्ला तीन वेगवेगळ्या टेकड्यांवर विस्तारलेला आहे. यात राजगिरी, कृष्णगिरी आणि चंदरायदुर्ग यांचा समावेश आहे. तुम्ही येथे ट्रेकिंगचा आनंद देखील घेऊ शकता.
जिंजी किल्ला मोक्याची लष्करी वास्तुकला, ज्यामध्ये ग्रॅनाइट दगडांच्या विशाल भिंती, खोल खंदक आणि सात मजली 'कल्याण महाल' यांचा समावेश आहे. या सर्वांसाठी किल्ला प्रसिद्ध आहे.
तमिळनाडूतील जिंजी किल्ला हा राजगड आणि रायगडनंतर मराठा साम्राज्याची 'तिसरी राजधानी' म्हणून ओळखला जातो. इतिहासात या किल्ल्याचे मोठे महत्त्व आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली ऐतिहासिक दक्षिण मोहीम दरम्यान विजापूरच्या आदिलशाही फौजांचा पराभव करून तमिळनाडूतील जिंजीचा किल्ला जिंकला.
जिंजी किल्ला पुदुच्चेरी (पाँडिचेरी) च्या अगदी जवळ आहे. तुम्ही येथे एकदा नक्की भेट द्या. तसेच हे ठिकाण फोटोशूटसाठी खूपच खास आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.