Shreya Maskar
नेहमी वीकेंडला मरीन ड्राइव्ह, गेट वे इंडिया, गिरगाव चौपाटी फिरून कंटाळा आला असेल तर या वीकेंडला तुमच्या लहान मुलांसोबत मरीन ड्राइव्हच्या जवळ असलेल्या एका सुंदर लोकेशनला नक्की भेट द्या.
मुंबईत मलबार हिलमध्ये प्रसिद्ध कमला नेहरू पार्क आणि हँगिंग गार्डन वसलेले आहे. ही दोन्ही पर्यटन स्थळे एकमेकांसमोर आहेत. तुम्ही येथे निवांत संध्याकाळ घालवू शकता.
कमला नेहरू पार्कचे मुख्य आकर्षण 'म्हातारीचा बूट' आहे. फक्त 'म्हातारीचा बूट' पाहण्यासाठी परदेशी पर्यटकही येथे गर्दी करतात.
हँगिंग गार्डनमध्ये विविध प्राण्यांच्या आकारात झाडे झुडपे कापलेली पाहायला मिळतात. हँगिंग गार्डन फोटोशूटसाठी मुंबईतील सर्वात सुंदर ठिकाण आहे.
कमला नेहरू पार्क आणि हँगिंग गार्डनला तुम्ही लहान मुलांसोबत नक्की या. उद्यानाच्या बाहेर खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे. येथे झोका, घसरगुंडी, सी-सॉ अशी अनेक खेळणी आहेत.
हँगिंग गार्डनमध्ये रंगीबेरंगी फुले, झाडे पाहायला मिळतात. तुम्ही येथे थंडगार वातावरण आणि हिरवाईमध्ये निवांत फेरफटका मारू शकता.
चर्नी रोड किंवा ग्रँट रोडला उतरून तुम्ही टॅक्सीने किंवा बसने कमला नेहरू पार्क आणि हँगिंग गार्डनला सहज पोहचू शकाल. संध्याकाळी येथे गर्दी पाहायला मिळते.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.