- अक्षय बडवे
Satara News: राज्यात अवकाळी पाऊस झाला. शेतक-यांच्या बांधवावर जाऊन पाहणी झाली. त्यानंतर नुकसानीचे अहवाल गेले. परंतु शेतकऱ्यांना गेल्या १५ दिवसांत कुठली ही मदत मिळालेली नाही. राज्यकर्त्यांनी पक्षाचा विचार न करता सर्वांबराेबर घेऊन शेतक-यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सातारा येथे व्यक्त केली.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आज (मंगळवार) ज्येष्ठ नेते शरद पवार हे साता-यात आले आहेत. पवार यांनी सातारा येथी रयत शिक्षण संस्थेच्या परिसरातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेत अण्णांना अभिवादन केले. त्यानंतर पवार यांच्या हस्ते राज्यातील रयत शिक्षण संस्थेमधील विविध शाळांचा उत्तम कामगिरी केल्याने सत्कार करण्यात आला. त्यावेळी रयतच्या वाटचालीबाबत पवार यांनी भाष्य केले.
शरद पवार म्हणाले पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा विचार व्यक्त केला. त्यानंतर कार्यकर्ते, साथीदारांच्या सहकार्यांच्या आग्रहामुळे मी थांबलो आहे (पायउतार मागे घेण्याचा विचार बदलला). कार्यकर्त्यांमुळे मला तो निर्णय मागे घ्यावा लागला असेही पवार यांनी नमूद केले.
पवार म्हणाले पक्ष संघटनेचे काम नव्या जोमाने आता होणार आहे. सामनातून तुम्ही पक्षात उत्ताराधिकारी उभा करु शकला नाही अशी टीका करण्यात आली आहे या प्रश्नावर पवार म्हणाले आम्ही काय केलं ते त्यांना माहिती नाही. हा आमचा घरातील प्रश्न आहे. आमची सत्ता आल्यानंतर अनेक जणांची आम्ही कॅबिनेट मंत्रीपद दिली. आम्हाला ठाऊक आहे की आम्ही काय करतो. महाविकास आघाडीवर भविष्यात काही ही परिणाम होणार नाही असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
कर्नाटकात आम्हांला एंट्री करायची आहे म्हणून आमच्या पक्षातील उमेदवार निवडणुक लढवत आहेत. फडणवीस यांच्या एनसपीचे पार्सल महाराष्ट्रात पाठवा या वक्तव्यावर पवार म्हणाले भाजप फक्त शब्दांचे खेळ करतात, अन्य काही नाही.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.