Shahaji Bapu Patil On Nana Patole : ज्याला वरचं, खालचं कळत नाही त्याला प्रदेशाध्यक्ष केलंय; शहाजी बापूंचा नाना पटोलेंना टाेला

Shahaji Bapu Patil : तिकीट वाटपात त्यांच्या (मविआ) चिंधड्या हाेतील असा दावा आमदार शहाजी बापू पाटील यांनी नमूद केले.
 Shahaji Bapu Patil, Nana Patole, Sangola,
Shahaji Bapu Patil, Nana Patole, Sangola, Saam TV

Pandharpur News : नाना पटोले म्हणजे ज्याला खालचं वरचं कळत नाही, त्याला काॅंग्रेसने कारभारी केले आहे. राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारा सध्याचा काँगेस प्रदेशाध्याक्ष असल्याची बाेचरी टीका शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी पटाेलेंवर केली. काँगेसकडे पद द्यायला माणूस नाही म्हणून नाना पटोलेंना (shahaji bapu patil on nana patole) पद दिल्याचे शहाजी बापूंनी म्हटलं. (Maharashtra News)

 Shahaji Bapu Patil, Nana Patole, Sangola,
Brij Bhushan Sharan Singh यांना अटक करा; दिल्लीतील आंदोलक कुस्तीगिरांना महाराष्ट्रातून पाठिंबा

सांगोला येेथे शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करणा-या बाबूराव‌ गायकवाड यांच्या अमृतमहोत्सव सत्काराचा कार्यक्रम आज (साेमवार) राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या कार्यक्रमानंतर आमदार शहाजी बापू पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. बापू म्हणाले दहा वर्षां नंतर आज शरद पवार साहेब यांचे दर्शन घेण्याचा योग आला. शरद पवार साहेबांना भेटू आनंद झाला. दरम्यान राजकारणात शरद पवार यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे बापूंनी व्यासपीठावरील भाषणा देखील आभार मानले.

 Shahaji Bapu Patil, Nana Patole, Sangola,
Aaditya Thackeray News : हुकुमशाहीची राजवट संपेल, महाराष्ट्रात बेईमानी टिकत नाही : आदित्य ठाकरे

राज्यात राजकीय स्फोट होणार या संजय राऊत (sanjay raut) यांच्या वक्तव्यावर शाहजी बापू म्हणाले असं संजय राऊत गेले चार महिने झाले बाेलत आहे, रोज सकाळी. बाेलू बाेलून त्यांचे मानगुट किती झालं बघा. आता ती एकदा भेलाकंडून पडतंय खाली असं वाटतय अशी टिप्पणी बापूंनी केली.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या द्वेषापाेटी ही मंडळी (मविआ) एकत्र येऊन काम करीत आहे. द्वेष मनात ठेवून केले जाणारे काम टिकत नसते. तिकीट वाटपात त्यांच्या (मविआ) चिंधड्या हाेतील असा दावा आमदार शहाजी बापू पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com