Brij Bhushan Sharan Singh यांना अटक करा; दिल्लीतील आंदोलक कुस्तीगिरांना महाराष्ट्रातून पाठिंबा

सांगलीतील श्री. अंबाबाई तालीम संस्थेच्या क्रीडांगणावर आजचे आंदोलन झाले.
Brij Bhushan Sharan Singh, sangli
Brij Bhushan Sharan Singh, sanglisaam tv

Sangli News : खासदार ब्रिजभूषणशरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh Latest Marathi News) यांच्यावर लैंगिक शोषण प्रकरणी गुन्हा दाखल असूनही अद्याप त्यांच्या कारवाई करण्यात न आल्याने दिल्लीतील आंदोलक कुस्तीगिरांच्या पाठीशी महाराष्ट्रातील क्रीडापटू, संघटक उभे राहिले आहेत. आज सांगली येथे सिंह यांच्यावरील कारवाईसाठी क्रीडापटूंनी आंदाेलन छेडले. (Maharashtra News)

Brij Bhushan Sharan Singh, sangli
Palghar News : पाण्यासाठी आईची वणवण; चौदा वर्षाच्या प्रणवने चार दिवसांत खणली विहीर

खासदार ब्रिजभूषणशरण सिंह यांच्यावर कारवाई करण्यासाठी संपूर्ण देशभर राष्ट्रीय खेळाडूंकडून आंदोलन होत आहे. मात्र, अद्यापही त्याची दखल घेतलेली दिसत नाही. सांगलीत आज (साेमवार) क्रीडाप्रेमींनी ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत आंदोलन केले.

शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राज्य क्रीडा संघटक संजय भोकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सिंह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आंदाेलकांनी परिसर दणाणून सोडला.

Brij Bhushan Sharan Singh, sangli
Maratha Kranti Morcha चा राज्य सरकारला अल्टीमेटम; पालकमंत्र्याच्या घरासमोर छेडणार गोंधळ घालो आंदोलन

यावेळी अयोध्या दौरा करणाऱ्या राज ठाकरेंना याच ब्रिजभूषण यांनी विरोध केला होता. आता राज ठाकरेंनी दिल्ली मधील आंदोलन स्थळी भेट देऊन त्यांना पाठिंबा दिला पाहिजे अशी मागणी यावेळी संजय भोकरे यांनी केली. सांगलीतील श्री. अंबाबाई तालीम संस्थेच्या क्रीडांगणावर आजचे आंदोलन झाले. या आंदोलनात खेळाडूंसह, कुस्तीपट्टू, क्रीडा प्रशिक्षक सहभागी झाले होते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com