Palghar News : पाण्यासाठी आईची वणवण; चौदा वर्षाच्या प्रणवने चार दिवसांत खणली विहीर

Son Dug a Well Outside The House to Help Mother: प्रणवची जिद्द पाहून पंचक्रोशीतील नागरिकांनी त्याचे कौतुक केले.
Pranav Ramesh Salkar, palghar news
Pranav Ramesh Salkar, palghar newssaam tv
Published On

Palghar News: आपल्या आईला अर्धा किलोमीटर अंतरावर जाऊन पाणी आणावे लागते हे पाहून प्रणव रमेश सालकर (Pranav Ramesh Salkar) या चौदा वर्षाच्या चिमुकल्याने चक्क घरासमोर खड्डा खोदून विहीर तयार केली. प्रणवच्या जिद्दीची आणि आईच्या प्रेमाची कहाणी हा हा म्हणता म्हणता पालघर तालुक्यात पसरली. त्यानंतर प्रणव राहत असलेल्या केळवे धावांगे पाडा (Kelve village) येथे जाऊन पंचक्रोशीतील नागरिकांनी त्याचे काैतुक केले. (Maharashtra News)

Pranav Ramesh Salkar, palghar news
Success Story : दाेनदा अपयश येऊनही आडळकर खचले नाही, हळदीतून एकरी अडीच लाखाचे मिळवले उत्पन्न; सेंद्रिय शेती प्रयोग केला यशस्वी

प्रणव याची आई दर्शना व वडील रमेश हे बागायतीमध्ये मजूर म्हणून काम करतात. आई मजुरी करून थकून भागून आल्यानंतर अर्धा किलोमीटर पाण्याला जाते. तिला त्रास सहन करावा लागतो. आई हाेणार त्रास थांबविण्यासाठी प्रणवने विहीर खोदण्याचा निर्धार केला. घराच्या अंगणात त्याने पहारीने खड्डा खोदायला सुरुवात केली. दररोज थोडा थोडा खड्डा खोदला. बारा ते पंधरा फूट खोल खड्डा केल्यानंतर त्याला गोड पाणी लागले आहे. त्याने ही विहीर चार दिवसांत पूर्ण केली.

Pranav Ramesh Salkar, palghar news
MPSC Success Story : झेडपीच्या शाळेत शिकलेल्या बीडच्या सीमा शेखने राेवला एमपीएससीत झेंडा; राज्यात महिलांत प्रथम

खड्डा खोदण्यासाठी प्रणावला अथक परिश्रम घ्यावे लागले. खोल खड्ड्यातून माती काढण्यासाठी त्याने स्वतःहून शिडी बनवली व त्याद्वारे तो माती खणून वर आणून टाकत होता. खड्डा खोदताना त्याला खडक लागले मात्र वडिलांच्या सहकार्याने त्याने हे दगडही काढले.

Pranav Ramesh Salkar, palghar news
Farmer Success Story: जिद्दीला सलाम! दिव्यांग असूनही तरूण शेतकरी हरला नाही, 10 एकरात केली शेती, ३ बहिणींची लग्नेही केली

अखेर खड्ड्यात पाणी आल्याने त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. खड्ड्यातील पाणी सालकर कुटुंब वापरण्यासाठी घेतात. त्यामुळे काही अंशी पाणी आणण्याचा त्रास दूर झाल्याचे प्रणवच्या आई दर्शना सालकर (darshana salkar) यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

केळवे गावात धावांगे पाडा असून येथे सहाशे ते सातशे लोकवस्ती आहे. खाऱ्या जमिनीमुले विहीर व बोरिंगला पाणी खारट येते. त्यामुळे या पाड्याला पाण्याची चणचण आहे. नळाला आठवड्यातून रविवार, मंगळवार व गुरुवारी पाणी येते. मात्र हे पाणी अपुरे पडत असल्याने नागरिकांचे हाल होतात. असेच हाल प्रणवच्या आईचे होत होते. हाल अपेष्टा न बघवल्याने प्रणवने विहीर खोदण्याचा चंग बांधला व त्याच्या जिद्दीने त्याने विहीर खोदून पूर्ण केली. त्याची ही जिद्द पाहून पंचक्रोशीतील नागरिकांनी त्याचे कौतुक केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com