Aaditya Thackeray News : हुकुमशाहीची राजवट संपेल, महाराष्ट्रात बेईमानी टिकत नाही : आदित्य ठाकरे

माथेरान हिल स्पोर्ट्स क्लबच्या कार्यक्रमास आज आदित्य ठाकरे माथेरान येथे आले हाेते.
Aaditya Thackeray , Matheran, Maharashtra Governemnt
Aaditya Thackeray , Matheran, Maharashtra Governemntsaam tv

Aaditya Thackeray In Matheran : माथेरान किंवा महाबळेश्वर (mahableshwar) या दोन्ही ठिकाणी डागडूजीची गरज आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नीट करायचं आहे. अनेक चांगल्या गोष्टी झाल्या आहेत. पुढे जात असताना अशा काही चांगल्या गोष्टी पर्यटकांसाठी होणं गरजेचं आहे. एमटीडीसी हॉटेल सोबत जॉईंट वेंचर करायचं होतं, ते अडकलं आहे असे आमदार आदित्य ठाकरेंनी माथेरान येथे नमूद केले.

हे सरकार आल्यानंतर काही गोष्टींना स्थगिती दिली आहे. मात्र पुन्हा एकदा आमचं सरकार आल्यानंतर चांगल्या गोष्टींना आम्ही प्रगतीपथावर आणू असे आमदार आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी माथेरान (matheran) दाै-या प्रसंगी आश्वासित केले. (Maharashtra News)

Aaditya Thackeray , Matheran, Maharashtra Governemnt
NCP अंतर्गत वादात गुंतली, सगळा प्रकार स्क्रिप्टेड; BJP च्या केंद्रीय मंत्र्यांचा दावा

माथेरान हिल स्पोर्ट्स क्लबच्या कार्यक्रमास आज ठाकरे हे माथेरान येथे आले हाेते. त्यावेळी ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडीवर बाेलताना आदित्य म्हणाले देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी (मविआ) आम्ही एकत्र आलाे आहाेत. जिथे जिथे हुकूमशाहीची लक्षणे दिसत आहेत तिथे आम्ही लढत आहोत आणि ही लढाई पुढेही अशीच सुरू राहील.

Aaditya Thackeray , Matheran, Maharashtra Governemnt
Shirdi त जाणा-या साईभक्तांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी (पाहा व्हिडिओ)

उद्धव ठाकरेंच्या बारसूतील सभेला परवानगी नाकारणे ही जशी हुकूमशाही दादागिरी हे घटनाबाह्य सरकार तिथल्या नागरिकांवर करते, ती आमच्यावरही दाखवत आहेत. मुळात प्रश्न हाच राहतो की इतका चांगला प्रकल्प असेल तर लाठीचार्ज आणि अश्रूधुर सोडण्याची काय गरज आहे? पालघर मध्ये आदिवासी महिलांना घराबाहेर काढलं गेलं. बारसूमध्ये असं होतंय. अनेक ठिकाणी ही हुकूमशाही आपल्याला आता दिसते. ही राजवट हुकूमशाहीची आहे.

Aaditya Thackeray , Matheran, Maharashtra Governemnt
Deepak Kesarkar News : जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांचे स्वप्न पूर्ण हाेणार ? शिक्षणमंत्र्यांकडून महत्त्वपूर्ण घाेषणा

आदित्य ठाकरे म्हणाले आता ज्या काही बाजार समितीच्या निवडणुका झाल्या, त्यापूर्वी विधान परिषद असेल, यामध्ये महाविकास आघाडीला जे काही यश मिळालं आहे आणि मिळणार आहे. त्यामुळे राज्यात महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा या निवडणुका होऊ देत नाहीयेत. त्यामुळे आता संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे.

मी पहिल्या दिवसांपासून सांगतोय की हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार. कारण हे घटना बाह्य सरकार आहे. लोकशाहीच्या विरुद्ध सरकार आहे आणि गद्दारांचं सरकार आहे. बेईमानांचा सरकार कधीही टिकत नाही, महाराष्ट्रात बेईमानी टिकत नाही असेही आदित्य ठाकरेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com