Ajit Pawar In Satara : मुख्यमंत्र्यांच्या शेतीवरुन अजित पवारांची मिमिक्री, कार्यकर्त्यांच्या शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर (पाहा व्हिडिओ)

विराेधी पक्ष नेते अजित पवार हे सातारा जिल्हा दाै-यावर आले आहेत.
Ajit Pawar, eknath shinde, satara, koregoan, ncp
Ajit Pawar, eknath shinde, satara, koregoan, ncpsaam tv

Ajit Pawar On CM Eknath Shinde : सुसंस्कृत महाराष्ट्राची शिकवण यशवंतराव चव्हाण (yashwantrao chavan) यांनी दिली. त्यांच्यानंतर पवार साहेब (sharad pawar) यांनी हे काम केले. अपयशाने खचून जायचं नाही आणि यशाचा उन्माद करायचा नाही. आत्ताच्या राज्यकर्त्यांना जनेतने नाकारले आहे. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकांत देखील यश मिळविण्यासाठी प्रयत्नशिल राहा असा सल्ला विराेधी पक्ष नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. (Maharashtra News)

Ajit Pawar, eknath shinde, satara, koregoan, ncp
Shahaji Bapu Patil On Nana Patole : ज्याला वरचं, खालचं कळत नाही त्याला प्रदेशाध्यक्ष केलंय; शहाजी बापूंचा नाना पटोलेंना टाेला

कोरेगाव बाजार समितीच्या नवीन संचालकांचा सत्कार व ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या आभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजिलेल्या मेळाव्यात राज्याचे विराेधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारच्या कामावर ताशेरे आेढले. व्यासपीठावर माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील, एनसीपीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने आदी उपस्थित होते.

Ajit Pawar, eknath shinde, satara, koregoan, ncp
Devendra Fadnavis In Belgaum : बेळगावत देवेंद्र फडणवीसांना दाखविले काळे झेंडे; महाराष्ट्र एकीकरण समिती अन् पाेलिसांची झटापट (पाहा व्हिडिओ)

शिंदे- फडणवीस सरकारचे कामकाज सर्व जनतेने महाराष्ट्रातील जबाबदार नागरीक म्हणून आत्मचिंतन करावे असे अजित पवार यांनी नमूद केले. ते म्हणाले काय झालं की मुख्यमंत्री (eknath shinde) साता-यात (त्यांच्या गावी) दाेन तीन दिवस इथे येऊन राहतात. काय तर शेती करताेय. स्ट्राॅबेरीपाहून कधी शेती हाेती का असा सवाल पवार यांनी केली. कधी झाडं बघायचे आणि कधी आणखी काय.

लाेक विचारतात कशाला गेलेत. मग त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात येते फाईल काढायला गेलेत अन् फाईल काढून काढून किती काढल्या तर 65. आम्ही दाेन तीन तासांत इतक्या फाईल काढताे असा चिमटा अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काढला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com