Shankaracharya Avimukteshwaranand Vs Mahant Narayangiri Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: कोण विश्वासू, कोण विश्वासघातकी? ठाकरे की फडणवीस? ठाकरेंसाठी शंकराचार्य भिडले

Tanmay Tillu

''उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे. जोपर्यंत ते पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत नाही, तोपर्यंत आमच्या मनाला होणार त्रास कमी होणार नाही'', असं जगद्गुरू शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले होते. स्वामी अविमुक्तेश्वरानंद सोमवारी मातोश्रीवर गेले होते. त्यांनी ठाकरे कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांचे शिष्यही त्यांच्यासोबत मातोश्रीवर आले होते. त्यांच्यासाठी मातोश्रीवर विशेष व्यवस्था करण्यात आली. हिंदू धर्मानुसार धार्मिक शिष्टाचारासह त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.

आता शंकराचार्य आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर महंत नारायणगिरी यांनी टीका केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात हिंदूत्वाच्या पुरस्कर्त्यांमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

यावरच बोलताना महंत नारायणगिरी म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार होते. पण उद्धव ठाकरे यांनीच धोका दिला. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारधारेला तिलांजली दिली आणि विरुद्ध विचारधारेसोबत ते गेलेत. शंकाराचार्य अशा लोकांच्या घरी जाऊन म्हणत आहेत की उद्धव ठाकरेंना धोका दिला. मात्र उद्धव ठाकरेंनी हिंदू समाजाला धोका दिला.

लोकसभा निवडणुकीत राज्यात पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नकली हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन डिवचलं होतं. त्यानंतर मुंबईत ठाकरे गटाचे खासदार निवडून आले त्यात मुस्लिम मतदारांचा मोठा फायदा ठाकरेंना झाल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट झालं होतं. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन ठाकरेंना लक्ष करण्यात आलं होतं. मात्र आता थेट शंकराचार्यानीच मातोश्रीवर भेट दिल्यामुळे ठाकरे गट पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक झालाय.

राज्यात पुढच्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत. लोकसभेत हिंदुत्वाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. आगामी विधानसभेत हिंदू मतांचा फटका ठाकरेंना बसू नये यासाठी आता ठाकरे गटाकडून प्रयत्न केले जात असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश प्रमाणंच राज्यातही महंत राजकारणाच्या आखाड्यात उतरुन आपापली भूमिका मांडतायत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये यावरुन राजकारण तापणार हे नक्की.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Ast 2024: बुध ग्रहाची अस्त स्थित पडणार महागात; 'या' राशींना आर्थिक नुकसानासह कामात येणार अडथळे

Maharashtra Politics: आमदार अपात्रता प्रकरणावर आज 'सर्वोच्च' सुनावणी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आज फैसला होणार?

Maharashtra News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ सप्टेंबर अमेरिका दौऱ्यावर

Anil Bonde News: 'राहुल गांधींची जीभ छाटू नये, चटके द्यायला हवे', भाजप खासदाराचे खळबळजनक विधान

Green Road Place: कपल्सला भुरळ घालणारे ठाण्यातील प्रसिद्ध ठिकाण; एकदा गेलात की परत जाल

SCROLL FOR NEXT